Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनिल अंबानी यांची ईडीकडून चौकशी

मुंबई/प्रतिनिधी ः देशातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांची अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून (एऊ) चौकशी सुरु आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद

राजूरच्या सर्वोदय विद्यालयात सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित
प्रेम संबंध ठेवण्यास नकार देणार्‍या तरुणीचा विनयभंग
नांदेड शहरातील डॉ. आंबेडकर नगरासह अन्य भागात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा

मुंबई/प्रतिनिधी ः देशातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांची अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून (एऊ) चौकशी सुरु आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायदा म्हणजेच फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीकडून त्यांची चौकशी सुरु आहे. या चौकशीसाठी अनिल अंबानी सोमवारी सकाळीच मुंबईतील ईडी कार्यालयात हजर झाले होते.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल अंबानी फेमाच्या चौकशीचा भाग म्हणून मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. फेमा कायद्याचे उल्लंघन याच्याशी संबंधित एका प्रकरणात त्यांची चौकशी सुरु आहे. ईडीच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, वेगवेगळ्या कलमांतर्गत नोंदवण्यात आलेल्या प्रकरणात 64 वर्षीय अनिल अंबानी यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. येस बँकेच्या कर्ज प्रकरणात बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अनिल अंबानी यापूर्वी 2020 मध्ये ईडीसमोर हजर झाले होते. आता पुन्हा ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार काल सकाळी ते 10 वाजता ईडी कार्यालयात हजर झाले. अनिल अंबानी यांचे अधिकारी ईडी कार्यालयाच्या बाहेर उभे होते. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबई हाय कोर्टाने 420 कोटी रुपयांच्या करचोरी प्रकरणात अनिल अंबानींना दिलासा दिला होता. तसेच कोर्टाकडून आयकर विभागाला अनिल अंबानींवर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये असे सांगण्यात आले होते.

COMMENTS