आईने मोबाईल हिसकावून घेतल्याचा राग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आईने मोबाईल हिसकावून घेतल्याचा राग

15 वर्षाच्या मुलाने घर केले उद्ध्वस्त

आजकाल मोबाईलचे व्यसन लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाना लागले आहे. मोबाईल नसेल तर लहान मुलं जेवत नाही. लहान मुलांना कमी वयात मोबाईल दिल्याने त्यांच्या

पद्मश्री पोपटराव पवार यांची राहीबाई पोपेरे यांनी बीज बँकेस दिली भेट
श्री क्षेत्र महाबळेश्‍वर येथे नदी संवाद यात्रेचा प्रारंभ
आमिषे दाखवून मतदारांना भुलवायचे आणि निवडणूक जिंकायची !

आजकाल मोबाईलचे व्यसन लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाना लागले आहे. मोबाईल नसेल तर लहान मुलं जेवत नाही. लहान मुलांना कमी वयात मोबाईल दिल्याने त्यांच्या आरोग्यावर आणि डोळ्यांवर परिणाम पडतो. या शिवाय मुलांना मानसिक आजार देखील होतात. दरम्यान सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. एका महिलेने तिच्या १५ वर्षांच्या मुलाच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला. यानंतर मुलाने जे केले ते पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. फोन हिसकावल्याचा मुलाला इतका राग आला की त्याने संपूर्ण घर उद्ध्वस्त केले. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की घराची खोली कशी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. सगळीकडे तोडफोड करण्यात आली आहे. आजच्या पिढीला मोबाईलचे व्यसन टाळण्यासाठी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुलांवर संस्कार करणे किती महत्त्वाचे आहे हे दृश्य पाहून स्पष्ट होते.

COMMENTS