राज्यपालांच्या मराठीद्वेषी वक्तव्यानंतर महाराष्ट्रात संताप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यपालांच्या मराठीद्वेषी वक्तव्यानंतर महाराष्ट्रात संताप

राष्ट्रवादी काँगे्रसकडून ‘राज्यपाल हटाओ महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन

मुंबई-पुणे/प्रतिनिधी :राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केलेल्या मराठीद्वेषी वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त

पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने मुन्नाभाई फरार
भंडारा रुग्णालय आग घटनेनंतरही सरकार झोपेतच : प्रविण दरेकर
Aurangabad :कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वारसांना मदतनिधी देण्याचे काम युद्धपातळीवर | LOKNews24

मुंबई-पुणे/प्रतिनिधी :राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केलेल्या मराठीद्वेषी वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात असून, राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. राज्यपाल कोश्यारी कार्यक्रमात म्हणाले होते की, कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलेच जाणार नाही.
दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावर संपूर्ण राज्यातून टीका होत आहे. यावर बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, यात त्यांनी मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई आर्थिक राजधानी आहे. आम्ही राज्यपालांशी असहमत आहोत, अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतली. ते शनिवारी (30 जुलै) नाशिकल जिल्ह्यात मालेगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यपालांचं विधान वैयक्तिक आहे. त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही. 106 हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे योगदान सर्वांना माहिती आहे. मराठी माणसामुळे मुंबईला नावलौकिक प्राप्त झाला आहे. राज्यपालांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील खुलासा केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यपाल हे एक मोठं पद आहे. राज्यपाल हे संवैधानिक पद असून ते राज्याचे एक प्रमुख व्यक्ती असतात. त्यामुळे त्यांनी कुणाचाही अवमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. विशेषतः मुंबईतील मराठी माणसाच्या योगदानाची कुणालाही अवहेलना किंवा अवमान करता येणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, पुण्यात पुण्यातील अलका चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल हाटाओ महाराष्ट्र बचाओ, असे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या देखील उपस्थित होत्या. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मराठी माणसाचे योगदान वादातीत :मुख्यमंत्री शिंदे
राज्यपालांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनवण्यामागे मराठी माणसांचे योगदान आहे. ते कुणीही नाकारू शकत नाही. या मुंबईत इतर राज्यातील लोकही रोजगार करतात. इतर समाजाचे लोकही व्यवसाय, व्यापार करतात. परंतु, मुंबईत जे काही सामर्थ्य आहे, महत्त्व आहे त्यामुळेच हे होतं. याचं श्रेय इतर कुणालाही घेता येणार नाही. मुंबईत मराठी माणसाच्या अस्मितेचा कुणालाही अवमान करता येणार नाही. आम्ही शिवसेना म्हणून मराठी माणसाच्या मागे आहोत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राज्यपालांच्या विधानाशी सहमत नाही : फडणवीसांची स्पष्टोक्ती
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईविषयी केलेल्या वादग्रस्त विधानापासून फारकत घेतली आहे. ’राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासामध्ये व वाटचालीमध्ये मराठी माणसांचे जे कार्य व श्रेय आहे, ते सर्वाधिक आहे. उद्योगाच्या क्षेत्रासह जगभरात मराठी माणसांचे नाव मोठे आहे,’ असे ते म्हणालेत.

कोश्यारींना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची गरज : उद्धव ठाकरे
राज्यपालांनी गेल्या तीन वर्षापासून ज्या महाराष्ट्राचे मीठ त्यांनी खाल्ले. त्या मिठासोबत त्यांनी नमकहरामी केली आहे. महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. ही सगळी संस्कृती त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून पाहिली असेल. आता त्यांना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची गरज आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली.कोश्यारींनी हिंदूमध्ये फूट पाडण्याचे काम केले आहे. त्यामुळे राज्यापालांना घरी पाठवायचे की त्यांना तुरुंगात पाठवायचे हा विचार करण्याची गरज आहे.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला : राज्यपाल कोश्यारी
आपल्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात टीकेची झोड उठवल्यानंतर राज्यपालांनी सारवासारव करत, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे.मी काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात जे विधान केले, त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा हेतू नव्हता. मी फक्त गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानाबद्दल बोललो. मराठी माणसांनी कष्ट करून महाराष्ट्र घडवला.

COMMENTS