……आणि नोबेल शांततेविना पोरकाच राहिला !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

……आणि नोबेल शांततेविना पोरकाच राहिला !

दुसऱ्या महायुध्दानंतर जगात शांतता नांदावी, अशा राजकीय प्रयत्नांचा आभास कायम राहीला. दुसऱ्या महायुद्धातील जैविक विनाश पाहिल्यावर जगाच्या कोणत्याही भूभ

समृद्धीच्या दुसर्‍या टप्प्याचे लोकार्पण
पत्नीला सासरी पाठविण्यास नकार; जावयाने कुऱ्हाडीने घाव घालून केला सासूचा खून | LOKNews24
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात तारू आणि पारस या दोन वाघांची झुंज 

दुसऱ्या महायुध्दानंतर जगात शांतता नांदावी, अशा राजकीय प्रयत्नांचा आभास कायम राहीला. दुसऱ्या महायुद्धातील जैविक विनाश पाहिल्यावर जगाच्या कोणत्याही भूभागावर युध्द नको यासाठी तत्पर झालेल्या जागतिक संस्था आणि त्या अपेक्षेने चालणारे जागतिक  राजकारण यातून असे वाटे की, युध्द या भूतलावर कायमचे नष्ट होईल. परंतु, सोवियेत रशिया आणि अमेरिका या तत्कालीन दोन महाशक्तीत विभागलेल्या गेलेल्या जगात शीतयुद्ध एव्हाना सुरू झालेच होते. मात्र, प्रत्यक्ष युध्द होणार नाही, अशी जगाची अपेक्षा असताना व्हिएतनाम नाम या जगाच्या नकाशावर चिमुकले राष्ट्र असणाऱ्या भूमीवर १९७५ ला युध्द झाले आणि या युध्दात अमेरिकेचे जवळपास पाऊण लाख सैन्य धारातिर्थी पडले आणि युध्द समाप्ती झाली. व्हिएतनाम हा कम्युनिस्ट देश आणि अमेरिका भांडवलदारी व्यवस्थेचा देश. या दोघांमधले युध्द दोन वेगवेगळ्या विचारसरणीशी निगडित होते. परंतु, हे युध्द होवू नये यासाठी १९६० पासून प्रयत्न करणारे एक तरूण व्यक्तिमत्त्व त्याकाळात जागतिक पातळीवर सक्रिय होते, त्यांचे नाव भदन्त थिक न्हात हॅन्ह. ११ ऑक्टोबर १९२६ मध्ये व्हिएतनाम मध्ये जन्मलेले भदन्त थिक न्हात हॅन्ह बौध्द धम्माचे भिक्षू असले तरी ‘युध्द नको बुद्ध हवा’ यासाठी म्हणजे जागतिक शांततेसाठी प्रयासरत होते. शांततादूत असणारे भदन्त थिक न्हात हॅन्ह यांच्यावर मात्र उलटेच संकट ओढवले. त्यांना त्यांच्या जन्मभूमीतूनच निष्कासित केले गेले. जागतिक शांततेसाठी आयुष्य खर्ची घातलेले असे दोन महान बौध्द भिक्षू जगात राहीले त्यात पहिले भदन्त थिक न्हात हॅन्ह आणि दुसरे भदन्त दलाई लामा. या दोघांच्या जीवनात काही साम्य आहे. दोन्हीही बौध्द भिक्षू, दोघेही आपापल्या जन्मभूमीतून निष्कासित. दोघांनाही युरोप-अमेरिकेत अनुयायी अधिक. दोन्हीही आंतरराष्ट्रीय शांतीदूत. पण यातील भदन्त दलाई लामा हे वयाने भदन्त थिक न्हात हॅन्ह यांच्यापेक्षा वयाने काही वर्षें लहान. परंतु, दलाई लामा यांना १९९१ चा जागतिक शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. परंतु, भदन्त थिक न्हात हॅन्ह यांना १९६७ चा जागतिक शांततेचा पुरस्कार द्यावा यासाठी १९६४ सालचा जागतिक शांततेचा पुरस्कार विजेते मार्टीन ल्यूथर किंग यांनी शिफारस करूनही तो मिळाला नाही. एक प्रकारे नोबेल पुरसकारच शांततादूताच्या अभावी पोरका राहिला, असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. थिक न्हात हॅन्ह यांचे व्यक्तिमत्त्व कम्युनिस्ट आणि भांडवलदारी अशा दोन्हीही सत्ताधिशांना अडचणीचे वाटत राहिले. कारण या दोन्ही सत्ता मानवतेच्या कल्याणासाठी किंवा खऱ्याखुऱ्या शांततेसाठी प्रयासरत नसून एकमेकांच्या देशांतील नैसर्गिक साधनसंपत्ती यावर डोळा ठेवूनच महासत्तांचे राजकारण होत राहिले. नव्वदीच्या काळात सोविएत रशियाचे पतन झाल्यानंतर १९८९ साली शांततेचा नोबेल पुरस्कार भदन्त दलाई लामा यांना देण्यात अमेरिकेची चीन विरोधातील राजकारणाची एक झलक निश्चित दिसते. अर्थात, दलाई लामा यांचा शांतता नोबेल पुरस्कार मिळण्याचा अधिकार सर्वाधिक सशक्त आहे. मात्र, हा पुरस्कार थिक न्हात हॅन्ह यांना देखील मिळायलाच हवा होता. परंतु, जागतिक पुरस्कार अत्योत्तम गुणवत्तेचे असूनही त्यांच्यामागील राजकारण देखील लपून राहत नाही. भदन्त थिक न्हात हॅन्ह यांना १९६० पासूनच व्हिएतनाम मधून निष्कासित करण्यात आले होते. जन्मभूमी ला पारखे झालेले थिक न्हात हॅन्ह यांनी भांडवलदारी आणि कम्युनिस्ट अशा दोन्ही देशांशी आपल्या विचारांच्या कसोटीवरच संबंध ठेवले. त्यामुळे जागतिक शांततेचे दूत असणारे थिक न्हात हॅन्ह यांना या दोन्ही विचारसरणी ने न्याय दिला नाही. पण, काही व्यक्तिमत्त्व अशी असतात की, जगातील कोणतीही सत्ता, कोणताही पुरस्कार हा त्यांच्या समोर कनिष्ठ ठरतो. थिक न्हात हॅन्ह यांचे आयुष्य जगाला कायम प्रेरणादायी राहील. आज २२ जानेवारी २०२२ ला अखेरचा श्वास घेत त्यांचे महापरिनिर्वाण झाले. या शांतीदूताला विनम्र अभिवादन.

COMMENTS