आनंदऋषीजी हॉस्पिटल रुग्णांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवत आहे : डॉ.संजय घोगरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आनंदऋषीजी हॉस्पिटल रुग्णांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवत आहे : डॉ.संजय घोगरे

अहमदनगर- सरकारच्यावतीने प्रत्येक शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा पुरविण्याचे काम करत आहे. त्याचप्रमाणे आनंदऋषीज

खोपडीतील शेतकर्‍यांना 18 वर्षांनंतर मिळाला जमिनीचा मोबदला  
भविष्यात पुन्हा युती होईल का याचे काळच उत्तर देईल : रविंद्र बोरावके यांचे सूतोवाच
नऊ दुर्गांनी केला मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

अहमदनगर- सरकारच्यावतीने प्रत्येक शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा पुरविण्याचे काम करत आहे. त्याचप्रमाणे आनंदऋषीजी हॉस्पिटलही काम करत असून, त्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना मोठा आधार ठरत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ संबंधितांना मिळवून देऊन या योजना प्रभावीपणे राबवत आहेत. त्यामुळे रुग्णांचा आर्थिक भार कमी होत आहे. अत्याधुनिक मशिनरीच्या सहय्याने या ठिकाणी उपचार होत असल्याने नगरसह महाराष्ट्रातून रुग्ण या ठिकाणी येत आहेत, हीच त्यांच्या सेवेची पावती आहे. अशा जनसेवेचे व्रत घेतलेल्या हॉस्पिटलला आमचे नेहमीच सहकार्य राहील, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय घोगरे यांनी केले.
आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे आयोजित दुर्बिनीद्वारे शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मर्चंटस् बँकेचे संस्थापक हस्तीमलजी मुनोत, बँकेचे चेअरमन आनंदराम मुनोत, संचालिका प्रमिलताई बोरा, मीनाताई मुनोत, आयोजक ताराचंद हंसराज बोथरा फर्मचे रमेश (बाळूशेठ) बोथरा, दिपक बोथरा, अनिता बोथरा, ज्योती बोथरा, अशोक बोथरा, जितेंद्र बोथरा, निलेश बोथरा, प्रकाश बोथरा, उत्कर्ष बोथरा, जैन सोशलचे डॉ.प्रकाश कांकरिया, वसंत कटारिया, संतोष बोथरा, सतीश लोढा, प्रकाश छल्लानी, डॉ.आशिष भंडारी शिबीरातील तज्ञ स्त्रीरोग तज्ञ डॉ.रविंद्र मुथा, डॉ.भास्कर जाधव, डॉ.सौ.सोनल बोरुडे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी हस्तीमलजी मुनोत म्हणाले, जैन सोशल फेडरेशनचे कार्यकर्ते करत असलेले हे सेवा कार्य समाजासाठी दिशादर्शक असेच म्हणावे लागेल. सर्वसामान्य नागरिकांना कमी दरात उत्कृष्ट सेवा देत असल्याने आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये राज्यातील कानाकोपर्‍यातून रुग्ण या ठिकाणी येत आहे. हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दवा बरोबरच दुवा मिळत असल्याने रुग्ण आनंदाने घरी जात आहे. ही सेवा अशाच पद्धतीने सुरु राहण्यासाठी आमचे नेहमीच सहकार्य राहील. हॉस्पिटलचे आरोग्य सेवेचे वाढत असलेल्या कार्य पाहता आता हॉस्पिटलच्यावतीने कॅन्सर हॉस्पिटल सुरु करावे, असे सांगितले. याप्रसंग दिपक बोथरा म्हणाले, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सेवा कार्याचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. रुग्णांना मिळत असलेली सेवा, पदाधिकारी, डॉक्टर, कर्मचार्‍यांची सेवाभावीवृत्ती यामुळे हॉस्पिटलवरील विश्वास वाढत आहे. या सेवाकार्यात आम्हालाही सेवा करण्याची संधी मिळत आहे याचा आनंद आहे. या शिबीरात लॅप्रोस्कोपी, पोटाचे ऑपरेशन, हार्निया शस्त्रक्रिया, पित्तायश काढणे, स्त्रीयांची गर्भपिशवी काढणे, स्टॅपलर, लेझर पाईल्स शस्त्रक्रिया, अ‍ॅपेंडिक्स ऑपरेश, स्त्रींची वंधत्व तपासणी, कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया बाबतची तपासणी डॉ.भास्कर जाधव, स्त्रीरोग तज्ञ डॉ.रविंद्र मुथा, डॉ.सोनल बोरुडे आदिंनी केली. या शिबीरात 244 रुग्णांची तपासणी करण्यात आली. हे शिबीर दि.9 ते 31 मार्च पर्यंत सुरु राहणार आहे.

COMMENTS