Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरोग्य सेवेने मनुष्य जगवून, माणुसकी जिवंत ठेवण्याचे काम आनंदऋषीजी हॉस्पिटलने केले -आयुक्त डॉ. पंकज जावळे

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मोफत अस्थिरोग तपासणी शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्य सेवेने मनुष्य जगवून, माणुसकी जिवंत ठेवण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटलने केले आहे. महागाईच्या काळात या हॉस्पिटलमुळे सर

विद्यार्थ्यांनी सर्पमित्रांकडून घेतली सापांची माहिती
राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत साई प्रेरणा कलामंच प्रथम
कोपरगावात शिवजन्मोत्सव उत्साहात होणार साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्य सेवेने मनुष्य जगवून, माणुसकी जिवंत ठेवण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटलने केले आहे. महागाईच्या काळात या हॉस्पिटलमुळे सर्वसामान्य घटकाला आधार मिळाला आहे. मनुष्याचे निरोगी व व्याधीमुक्त जीवनासाठी या आरोग्यसेवेच्या महायज्ञाचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले.  

जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 31 व्या स्मृतिदिनानिमित्त स्व. सुशिलाबाई लखमीचंद बोथरा यांच्या स्मरणार्थ सतीशकुमार अजित बोथरा परिवाराच्या वतीने मोफत अस्थिरोग तपासणी, मणके व सांधेबद्दलची शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आयुक्त डॉ. जावळे बोलत होते. यावेळी होमिओपॅथी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. रणजीत सत्रे, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजित फुंदे, युनायटेड इन्शुरन्सचे अमर गुरव, पेमराज बोथरा, पोपटलाल लोढा, संतोष गुगळे, सचिन कटारिया, पुनमचंदजी गोलेचा (नागपूर), पारस वैद्य, परेश बोथरा, अपर्णा बोथरा, अर्णव बोथरा, प्रतिभा बोथरा, कोमल बोथरा, अस्थीरोग तज्ञ डॉ. अमित सुराणा, डॉ. विशाल शिंदे, बाबुशेठ लोढा, वसंत चोपडा, डॉ. आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी, निखील लोढा, डॉ. वसंत कटारिया आदी उपस्थित होते.  

प्रास्ताविकात डॉ. संतोष बोथरा म्हणाले की, चांगले लोक एकत्र आल्यास, चांगले काम उभे राहते. हे आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या रूपाने समाजासमोर आले आहे. कमी खर्चात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळत असल्याने राज्यभरातून रुग्ण हॉस्पिटलमध्ये येत आहे. विविध मोफत शिबिराच्या माध्यमातून गरजू घटकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. बीड व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व गावे हॉस्पिटलने दत्तक घेतली असून, गावोगावी जाऊन रुग्णांना सेवा दिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पाहुण्यांचे स्वागत करुन डॉ. प्रकाश कांकरिया म्हणाले की, हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी देशात हॉस्पिटलचे नाव नावाजले गेले आहे. अल्पदरात गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळत असल्याने सर्वसामान्य वर्ग या हॉस्पिटलकडे वळत आहे. तसेच नेत्र विभागाच्या माध्यमातूनही ग्रामीण भागात दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींना नवदृष्टी देण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. अमर गुरव यांनी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या कॅशलेस सुविधांची माहिती देऊन सेवाभावाने हॉस्पिटलचे कार्य सुरु आहे. सर्वात कमी खर्चात आरोग्यसेवा हॉस्पिटलमध्ये मिळत असल्याचे सांगितले.
अजित फुंदे म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांसाठी आरोग्यसेवा दिली जात आहे. सेवाभावाने सुरु असलेल्या हॉस्पिटलप्रमाणे मेडिकल कॉलेज देखील उभारणे काळाची गरज निर्माण झाली आहे. मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून अनेक सेवेकरी घडून आरोग्यसेवा इतरांना देऊ शकतील, असे सांगितले. तर आनंदऋषीजी महाराज यांच्या जन्मगाव चिचोंडी शिराळ येथील त्यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

 या शिबीरात 250 रुग्णांची मोफत अस्थिरोग तपासणी करण्यात आली. अस्थीरोग तज्ञ डॉ. विशाल शिंदे व डॉ. अमित सुराणा यांनी रुग्णांची तपासणी करुन त्यांना मार्गदर्शन केले. गरजेनुसार रुग्णांची सांधेबदली, गुडघा व खुबा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया अल्पदरात करण्यात येणार आहे. तर या शस्त्रक्रिया जन आरोग्य योजनेतंर्गत मोफतही होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.

COMMENTS