अहमदनगर/प्रतिनिधी : महापालिकेत शुक्रवारी आनंदोत्सव पसरला होता. मनपातील चार अभियंत्यांसह तब्बल 132 कर्मचार्यांना पदोन्नती मंजूर करण्यात आली आहे. आयुक
अहमदनगर/प्रतिनिधी : महापालिकेत शुक्रवारी आनंदोत्सव पसरला होता. मनपातील चार अभियंत्यांसह तब्बल 132 कर्मचार्यांना पदोन्नती मंजूर करण्यात आली आहे. आयुक्त शंकर गोरे यांनी याबाबत आदेश दिले आहेत. यापैकी 98 कर्मचार्यांना कालबद्ध, तर 34 कर्मचार्यांच्या पदोन्नतीला समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. अभियंते, प्रभाग अधिकारी, वरिष्ठ लिपिक यासह विविध पदांवर कार्यरत कर्मचार्यांच्या पदोन्नतीचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. यासंदर्भात आस्थापना विभागाकडून कागदपत्रांची पूर्तता करून पदोन्नती समितीसमोर प्रस्ताव सादर करण्यात आला होता. 12 वर्षे सेवा पूर्ण झालेले 64 व 24 वर्षे सेवा पूर्ण झालेले 34 अशा 98 कर्मचार्यांना कालबद्ध पदोन्नती मंजूर करण्यात आली आहे. तसेच सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ लिपिक, स्वच्छता निरीक्षक, मिळकत अधीक्षक अशा पदांवरील 34 जणांना पदोन्नती समितीच्या बैठकीत पदोन्नती मंजूर करण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्यांमध्ये आस्थापना विभागाचे प्रमुख अशोक साबळे यांना सहाय्यक आयुक्त म्हणून बढती देण्यात आली आहे. तर अभियंता गणेश गाडळकर, मनोज पारखे, श्रीकांत निंबाळकर व सदाशिव रोहोकले या शाखा अभियंत्यांना उप अभियंता म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच मिळकत अधीक्षक म्हणून सावेडीचे प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर यांना पदोन्नती देण्यात आली आहे. दरम्यान, या पदोन्नतीच्या वृत्ताने मनपात खुशीचे वातावरण पसरले आहे. बढतीबद्दल एकमेकांचे अभिनंदन अनेकांनी केले.
काहींची पगारवाढ, काहींना पदनाम लाभ
मनपाने 12 व 24 वर्षे सेवा झालेल्यांना कालबद्ध पदोन्नती दिल्याने या सर्वांची आता पगारवाढ होणार आहे. तर नियमित पदोन्नतीचा लाभ मिळालेल्यांपैकी काहींना पगारवाढ मिळणार असून, काहींना फक्त पदनाम बदलाचा लाभ मिळणार आहे. ज्यांना फक्त पदनाम बदलाचा लाभ मिळणार आहे, त्यांना याआधीच या नव्या पदाची पगारवाढ मिळालेली आहे. फक्त त्यांच्या पदाचे नाव त्यावेळी बदलले गेले नव्हते. आता या पदोन्नतीने त्यांचे पदनामही बदलले गेले आहे.
COMMENTS