Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एमआयडीसी जवळ झालेल्या अपघातात अनोळखी वृध्दाचा मृत्यू

अहमदनगर : नगर मनमाड रोडवरील एमआयडीसीतील  नागापूर परिसरातील गरवारे चौकात अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका अनोळखी ६० वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. 

एस.टी.महामंडळाच्या बसने दुचाकीला जबर धडक दिली
दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्या मित्रांचा अपघाती मृत्यू
राजस्थानमध्ये अपघातात 5 पोलिसांचा मृत्यू

अहमदनगर : नगर मनमाड रोडवरील एमआयडीसीतील  नागापूर परिसरातील गरवारे चौकात अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका अनोळखी ६० वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला.  गरवारे चौकात एका ६० वर्षीय अनोळखी पुरुषाचा अपघात झाल्याने त्यास खासगी रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, ते मयत झाले असल्याचे तेथील डॉक्टरांनी तपासणी करून घोषित केले. तशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बोठे यांनी रुग्णालयात नेमणुकीस. असलेले पोलीस अंमलदार जठार यांना दिली. त्यांनी दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सी आर पी सी १७४ प्रमाणे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयत वृध्दाची ओळख पटली नसून त्यांना कोणत्या वाहनाने धडक दिली हे देखील समोर आलेले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अधिक तपास पोलीस अंमलदार दिवटे करत आहे.

COMMENTS