पुणे प्रतिनिधी - ऐन दिवाळीच्या तोंडावर पुण्यामध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. आज सकाळी पुण्यातील सदाशिव पेठ परिसरातील भिकारदास मारुती जवळ एका हॉट

पुणे प्रतिनिधी – ऐन दिवाळीच्या तोंडावर पुण्यामध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. आज सकाळी पुण्यातील सदाशिव पेठ परिसरातील भिकारदास मारुती जवळ एका हॉटेलमध्ये आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. अग्निशमन दलाचे 3 वाहने दाखल झाली. हॉटेलमधून 3 सिलेंडर बाहेर काढण्यात आले. या आगीमध्ये एक 10 वर्षांची मुलगी अडकली होती. या मुलीला जवानांनी बाहेर काढले असून जखमी अवस्थेत अग्निशमन दलाच्या वाहनातून जवळच्या सूर्या सह्याद्री रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारदरम्यान या चिमुरडीचा मृत्यू झाला. दुकानाला आग कशामुळे आणि का लागली याचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. मात्र, या चिमुरडीच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
COMMENTS