Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सामाजिक बांधिलकीतून जनसेवेचे व्रत प्रेरणादायी

डॉ. विकास घोलप : वारीत 168 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी

कोपरगाव प्रतिनिधी : आपल्याला हवी असलेली व्यक्ती आपल्यातून कायमची निघून जाते. मात्र; त्या व्यक्तीनंतरही त्यांच्या स्मृतींना जिवंत ठेवण्याच्या माध्

पोलिसांची राज्यातील सर्वात मोठी कारवाई… ३१ हजार किलो गोमांस जप्त
राज्य सरकारच्या विरोधात सुजय विखे, राम शिंदे, शिवाजी कर्डीले बसले उपोषणाला (Video)
कारागृह पोलिस शिपाई परीक्षेत नगरच्या दोन केंद्रांवर गैरप्रकार

कोपरगाव प्रतिनिधी : आपल्याला हवी असलेली व्यक्ती आपल्यातून कायमची निघून जाते. मात्र; त्या व्यक्तीनंतरही त्यांच्या स्मृतींना जिवंत ठेवण्याच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविणे. व त्यातून गरजवंतांना मदत होणे हे समाजाच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण कार्य आहे. वारी गावात सलग तीन वर्ष मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेत शेकडो गरजवंतांना दृष्टी देण्याबरोबरच इतरही सामाजिक उपक्रम गावातील राहुलदादा मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे जनसेवेचे व्रत हे निश्‍चितच प्रेरणादायी आहे. असे मत कोपरगाव पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप यांनी व्यक्त केले.
    कोपरगाव तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत सदस्य राहुल दादा टेके पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त वारीसह पंचक्रोशीतील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर नुकतेच वारीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच विजय गायकवाड होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राहुल दादाची प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या शिबिरात एकूण 168 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी 20 रुग्णांवर नाशिक येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टेके म्हणाले, गेल्या तीन वर्षात राहुल दादाच्या जन्मदिनानिमित्त घेण्यात आलेल्या शिबिरात सुमारे 700 पेक्षाजास्त रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तर 150 पेक्षा जास्त रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यावेळी चित्रपट निर्माते राजेंद्र गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी उपसरपंच विजय गायकवाड यांचे अध्यक्षीय भाषण झाले. यावेळी तुलसी आय हॉस्पिटलचे डॉ. हर्षलजी पाठक, माजी पंचायत समिती सदस्य मधुकरराव टेके, माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकरराव टेके, प्रथम लोकनियुक्त सरपंच सतीशराव कानडे, ग्रामपंचायत सदस्य दिलीपराव काकळे, योगेश झाल्टे, प्रतिभा टेके, मदनशेठ काबरा, राजेंद्र टेके, गोरख टेके, विजय ठाणगे, भाऊसाहेब टेके, संजय कवाडे, मधुकर टेके, बच्चू गायकवाड, डॉ. सर्जेराव टेके, अशोक बोर्डे, दौलत वाईकर, दिनेश निकम, भीमराव आहेर, हुसेन शेख, चंद्रकांत पाटील, राजेंद्र मुरार, मच्छिंद्र मुरार, संतोष तवरेज, जगन्नाथ मैराळ, विजय ठाकरे, दीपक झाल्टे, विजय निळे, अशोक निळे, राजेंद्र ठाकूर, मयूर निळे, बबलू पठारे, मधुकर सोनवणे, शंकर धामणे, रोहन रोकडे, रोहित रोकडे, किरण टेके, मुन्नाभाई पटेल, सुरज टेके, स्वप्निल टेके, बिपिन टेके, साईराज टेके यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ, राहुलदादा वर प्रेम करणारे मित्र मंडळ उपस्थित होते.

COMMENTS