Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंदा शहरात एक हजार झाडे लावण्याचा उपक्रम

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात श्रीगोंदा नगरपरिषद व निसर्ग प्रेमी एक हजार झाडे लावुन श्रीगोंदा शहर ग्रीन सीटी करण्याचा उपक्रम राबविणार आहे. शुक्रवार

‘महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ’ कार्यक्रमात कोपरगावकर झाले लोटपोट
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या शाखांना संचालक बाबासाहेब बोडखे यांची भेट
दलित अत्याचारासंदर्भात तक्रारी आता कमी झाल्या ; अल्पसंख्याक आयोग अध्यक्षांचा दावा

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात श्रीगोंदा नगरपरिषद व निसर्ग प्रेमी एक हजार झाडे लावुन श्रीगोंदा शहर ग्रीन सीटी करण्याचा उपक्रम राबविणार आहे. शुक्रवारी सकाळी औटीवाडी तलावाजवळ श्रीगोंदा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांचे हस्ते जंगली झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत म्हणाल्या की श्रीगोंद्यातील निसर्ग प्रेमीचा वृक्ष लागवडीचा उपक्रम चांगला आहे. हा उपक्रम श्रीगोंदा शहरात राबविण्याची गरज आहे. त्यासाठी नगरपरिषद पुर्ण मदत करेल. हे शहरात होणे गरजेचे आहे. त्यासाठी या निसर्ग प्रेमींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. वृक्षमित्र नवनाथ दरेकर म्हणाले की 50 हजार बिया रोपनाचा कार्यक्रम सुरु केला आहे भविष्यात वृक्ष लागवड ही चळवळ निर्माण करण्यासाठी संत तुकाराम महाराज वृक्ष संवर्धन समिती स्थापन करुन या मध्ये युवकांना सहभागी करून वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचा मानस आहे. यावेळी शहाजी खेतमाळीस यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी देवीदास खेतमाळीस मिठू लंके विशाल दंडनाईक संकेत गांजुरे सहदेव खामकर सुभाष ठोकळ संदीप ठोकळे  धनंजय औटी संभाजी तरटे अभिजीत औटी अंकुश चौधरी मनिषा काकडे होते. आभार नवनाथ खामकर यांनी मानले.

COMMENTS