Homeताज्या बातम्यादेश

पुंछ सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश

जम्मू : जम्मू- काश्मीरच्या पुंछ येथे रविवारी एलओसीजवळ सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला. दहशतवादी आणि सुरक्षा दलात झालेल्या

परवानगी फांद्या तोडण्याची, मात्र तोडली संपूर्ण झाडे
अकोल्यातील बिरोबाचा यात्रोत्सव उत्साहात
आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटींच्या निधीची तरतूद 

जम्मू : जम्मू- काश्मीरच्या पुंछ येथे रविवारी एलओसीजवळ सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला. दहशतवादी आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला असून परिसरात सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
एलओसीजवळ शनिवारी मध्यरात्रीनंतर 3 पाकिस्तानी जिहादी दहशतवादी भारतीय सीमेत घुसखोरीच्या प्रयत्नात होते. हा प्रकार रात्री 2 वाजेच्या सुमारास सीमा रेषेजवळ गस्त घालणार्‍या सुरक्षा दलाच्या जवानांच्या लक्षात आला. यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. तर अन्य दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. भारतीय सैन्यातील कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले की, सीमा रेषेजवळ गस्त घालणार्‍या पथकाला पाकिस्तानमधून काही दहशतवादी भारतात घुसखोरी करत असल्याचे आढळले. यानंतर चकमक झाली आणि घुसखोरीचा डाव उधळला. किमान 3 दहशतवादी भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात होते. यातील एकाचा खात्मा झाला असून त्याचा मृतदेह सुरक्षा दलांच्या हाती लागला आहे. तर उर्वरित दोघे दहशतवादी जंगलात पसार झाल्याची शक्यता आहे. पुंछमध्ये घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर येताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

COMMENTS