नांदेड प्रतिनिधी - नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका आंतरजातीय विवाहितेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून 8 ते 10 जणांच्या टोळक्य

नांदेड प्रतिनिधी – नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका आंतरजातीय विवाहितेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून 8 ते 10 जणांच्या टोळक्याने 30 वर्षीय युवकाची हत्या केली आहे . नुरी चौक परिसरातील वसंता नगर भागात घराशेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत स्वप्नील नागेश्वर याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. स्वप्नील याचंही वर्षभरापूर्वी लग्न झालं होतं. मात्र, त्याचे विवाहबाह्य संबंध आहेत, असा संशय आरोपींना होता.स्वप्नील आणि ती विवाहिता नांदेड शहरातील एका हॉटेलमध्ये एकत्र असल्याचं समजल्यानंतर 8 ते 10 तरुणांनी लगेचच याठिकाणी धाव घेतली. यानंतर त्यांना जबरदस्तीने उचलून रिक्षामध्ये टाकलं. आरोपींनी दोघांना गोदावरी नदी घाटाशेजारील आणलं. याठिकाणी आणून त्यांना मारहाण करण्यात आली. 8 ते 10 जण महिलेला धमकावत असल्याचा प्रकार तिथे असलेल्या सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाला आहे.
COMMENTS