Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुचाकीची धडक बसल्याने वृद्ध महिलेचा झाला मृत्यू

अहमदनगर/प्रतिनिधी ः दुचाकीची धडक बसून वृध्द महिलेचा मृत्यू झाला. निर्मला टोपणदास चिमनानी (वय 70, रा. मिस्कीन मळा, तारकपूर) असे मृत वृध्द महिलेचे

विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकाचा मृत्यू
६८ व्या मजल्यावरुन खाली पडून प्रसिद्ध स्टंटमॅनचा मृत्यू
सहलीला निघालेल्या एसटी बसला भीषण अपघात

अहमदनगर/प्रतिनिधी ः दुचाकीची धडक बसून वृध्द महिलेचा मृत्यू झाला. निर्मला टोपणदास चिमनानी (वय 70, रा. मिस्कीन मळा, तारकपूर) असे मृत वृध्द महिलेचे नाव आहे. 30 मार्च रोजी रात्री मिस्कीन रोड, चिनी टेलरच्यासमोर तारकपूर येथे हा अपघात झाला. याप्रकरणी 1 एप्रिल रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित टोपणदास चिमनानी (वय 39) यांनी फिर्याद दिली आहे.

30 मार्च रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास निर्मला चिमनानी या किराणा आणण्यासाठी घराबाहेर पडल्या. त्या मिस्कीन रोडने जात असताना मिस्कीन मळ्याकडून नगर-मनमाड रोडकडे भरधाव वेगाने दुचाकीवर जाणार्‍या व्यक्तीने त्याच्या दुचाकीची धडक निर्मला यांना दिली. मोठा आवाज झाल्याने त्यांचा मुलगा धावत घटनास्थळी आला. तोपर्यंत दुचाकीस्वार दुचाकी घेवून पसार झाला होता. जखमी निर्मला यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा 31 मार्च रोजी दुपारी मृत्यू झाला. अज्ञात दुचाकीस्वाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

COMMENTS