सातारा / प्रतिनिधी : जागतिक एड्स दिनानिमित्त स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात एड्स जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. य

सातारा / प्रतिनिधी : जागतिक एड्स दिनानिमित्त स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात एड्स जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.
या प्रसंगी डॉ. एस. एस. दहातोंडे, दिवाणी न्यायाधीश एस. एस. साळवे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, डॉ. रविंद्रनाथ चव्हाण, जिल्हा शल्यचकित्सकडॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितल बडधे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
एचआयव्ही या आजाराचे अजूनही समुळ उच्चाटन झालेले नाही. युवकांनी जबाबदार वर्तन अवगत करुन एचआयव्ही आजारापासून दूर रहावे, असे आवाहन करुन एचआयव्ही निर्मुलनामध्ये युवकांची भूमिका ही खूप महत्वाची आहे यासाठी युवकांनी एकत्रीत येऊन एचआयव्ही विरोधी लढा दिला पाहिजे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी खिलारी यांनी केले.
COMMENTS