Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वसईत एटीएम मशीन लुटण्याचा प्रयत्न फसला

मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून वसई विरार परिसरात एटीएम लुटण्याच्या घटना समोर येत आहेत. वसईमध्ये पुन्हा एकदा एटीएम केंद्र लुटण्याचा प्रयत्न केल्य

beed स्वतःच्या नावे जमीन करून हडपण्यासाठी आईला दाखवले मयत ! (Video)
कला शिक्षक निर्मळ यांनी रेखाटला अक्षर गणेश
78 हजार अनुसूचित जातींच्या तरूणांच्या नोकर्‍यांवर गंडांतर

मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून वसई विरार परिसरात एटीएम लुटण्याच्या घटना समोर येत आहेत. वसईमध्ये पुन्हा एकदा एटीएम केंद्र लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. वसई पश्‍चिमेच्या बाभोळा येथे हा प्रकार उघडकीस आला. परिसरातील एसबीआय बँकेचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न मध्यरात्री झाला. मात्र यंत्र फोडता न आल्याने चोरांनी पळ काढला. या चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वसई पश्‍चिमेला बाभोळा येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरांच्या एक टोळीने या एटीएम केंद्रात शिरून यंत्र फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना एटीएम यंत्र फोडता आले नाही.

COMMENTS