Homeताज्या बातम्यादेश

राजस्थानच्या भरतपूरमध्ये हवाई दलाचे विमान कोसळले

राजस्थान प्रतिनिधी- राजस्थान मधील भरतपूरमध्ये भारतीय लष्काराच्या फायटर जेटचा मोठा अपघात झाला आहे. हे विमान भरतपूरच्या सावेर पोलीस स्टेशन हद्द

पुण्यातील प्रणव कराड अमेरिकेतून बेपत्ता
चार लाख वीस हजारांचे अठरा मोबाईल नागरिकांना केले परत
सावरकरांचा जन्मदिवस ’स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून होणार साजरा

राजस्थान प्रतिनिधी- राजस्थान मधील भरतपूरमध्ये भारतीय लष्काराच्या फायटर जेटचा मोठा अपघात झाला आहे. हे विमान भरतपूरच्या सावेर पोलीस स्टेशन हद्दीतील नागला विसा परिसरात कोसळले. आज सकाळी हा अपघात झाला आहे. या विमानामध्ये किती जण बसले होते याबाबतची अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाहीये. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, बचाव कार्य सुरू आहे. भारतीय वायुसेनेला देखील या फायटर जेटच्या अपघाताची माहिती देण्यात आली आहे. या विमानाचा अपघात नेमका कसा झाला? याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही हे विमान राजस्थानच्या भरतपूरमधील नागला विसा गावाच्या परिसरात कोसळले. हे फायटर जेट मोकळ्या जागेत कोसळल्यानं सुदैवानं मोठा अपघात टळला आहे. जर हे विमान गावावर कोसळले असते तर मोठा अपघात झाला असता. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून, पोलिसांकडून गर्दी न करण्याचं आव्हान करण्यात आलं आहे.

COMMENTS