Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमृतवाहिनी ज्युनिअर कॉलेजची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

संगमनेर/प्रतिनिधीः गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाला वाव देणार्‍या अमृतवाहिनी मॉडेल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने आपल्या उ

‘त्या’ तीन महिलेचा खून करून जाळलं | DAINIK LOKMNTHAN
शेतकर्‍यांच्या जीवनात पशुधनाचे मोठे महत्त्व ः थोरात
माजी आमदार चौधरी यांना त्वरित अटक करावी-

संगमनेर/प्रतिनिधीः गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाला वाव देणार्‍या अमृतवाहिनी मॉडेल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली असून यावर्षी 90.90%  निकाल लागले असल्याची माहिती प्राचार्य शीतल गायकवाड यांनी दिली.
निकालाबाबत  माहिती देताना प्राचार्य  गायकवाड म्हणाल्या की, संस्थेच्या विश्‍वस्त  शरयू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने नवनवीन उपक्रम राबवले जात असून विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला प्रोत्साहन दिले जात आहे. अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेजने आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली असून यावर्षी 154 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली असून यामधून 140 विद्यार्थी पास झाले आहे. यातील बहुतांश विद्यार्थ्यांना उच्चतम गुण मिळाले आहेत. यात तन्मय अरविंद आरोटे यांनी 67.83% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तर शुभम बाळासाहेब गायकवाड यांनी 67.17% गुण मिळवून द्वितीय क्रमांक, गिरीराज अंकुश कुलकर्णी यांनी 65.67% गुण मिळून तृतीय क्रमांक, साक्षी अनिल कांबळे हिने 65.17% गुण मिळवून चतुर्थ क्रमांक, 65 टक्के गुण मिळवून ईशान जतीन कालडा याने पाचवा क्रमांक मिळवला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, विश्‍वस्त शरर्यू देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, बाजीराव पा.खेमनर, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्री थोरात, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा विवेक धुमाळ, प्राचार्य शितल गायकवाड, उपप्राचार्य प्रा उदय करपे आदींसह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS