नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या वतीने संपूर्ण देशातील राबवण्यात येणाऱ्या माझी माती माझा देश अभियान राबवण्यात येत आ
नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या वतीने संपूर्ण देशातील राबवण्यात येणाऱ्या माझी माती माझा देश अभियान राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने प्रत्येक तालुक्याचा अमृत कलश हा जिल्हास्तरावर आणण्यात येणार असून शनिवारी जिल्हा परिषदेच्या वतीने माझी माती माझा देश अभियानांतर्गत अमृत कलश हे जिल्हास्तरावर गोळा करण्यात येणार आहेत. कालिदास कला मंदिर येथे नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी निमंत्रित सरपंच, प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
माझी माती माझा देश अभियानांतर्गत जिल्ह्यातील १३८८ ग्रामपंचायतींमध्ये अमृत कलश यात्रा या काढण्यात आल्या. प्रत्येक गावातून अमृत कलशात माती गोळा करून कलशाचे संकलन हे तालुका स्तरावर करण्यात आले. अमृत कलश अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींतून तालुका स्तरावर अमृत कलश हे गोळा करण्यात आले यातून प्रत्येक तालुक्याचा एक अमृत कलश तयार करण्यात आला आहे. हे सर्व अमृत कलश हे जिल्हास्तरावर गोळा करण्यात येऊन नेहरू युवा केंद्राच्या वतीने सर्व कलश हे मुंबई येथे राज्यस्तरावर व त्यानंतर दिल्ली येथे सर्व कलश हे पाठवण्यात येणार आहेत.
COMMENTS