Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमोल गर्जे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

पाथर्डी ः भाजप जिल्हा उपाध्यक्ष अमोल अशोक गर्जे यांचा वाढदिवस मतिमंद व मूकबधिर विद्यालया मध्ये विध्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन, वन्य प्राण्यांसाठी

ऊस बेणे विक्रीसाठी ‘सोशल मिडीया’चा वापर | आपलं नगर | LokNews24 |
कोपरगावमध्ये ८ मे पर्यंत कडक जनता कर्फ्यु
आरोपीचा पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न

पाथर्डी ः भाजप जिल्हा उपाध्यक्ष अमोल अशोक गर्जे यांचा वाढदिवस मतिमंद व मूकबधिर विद्यालया मध्ये विध्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन, वन्य प्राण्यांसाठी पानवठ्यामध्ये पाणी सोडून, श्रीकृष्ण गोशाळा या ठिकाणी गाईंना चारा, रक्तदान शिबिर, मोफत डोळे तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, महिला प्रशिक्षण, वृक्षारोपण उपक्रम अशा विविध समाजिक उपक्रमांनी मित्र मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला.
यावेळी  मुकुंद गर्जे,वैभव खेडकर, संदीप फुंदे, सचिन रोडी, प्रशांत शेळके, सुनील बेळगे, शुभम येळाई, दीपक दूरकर, किरण पुरी, हर्षद गर्जे, कृष्णा रेपाळ, गणेश गोंधळी, सतीश तरटे, शुभम नहार, आनंद शिरसागर, सिद्धांत मानुरकर, लक्ष्मण पावटेकर, प्रशांत सोनवणे, राहुल कासार, अमित सरोदे, प्रसाद देवढे, प्रमोद कुमठेकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अमोल गर्जे यांनी म्हटले की,स्व गोपीनाथ मुंडे यांनी दाखवलेला मार्ग आणि यांच्या शिकवणीतून आजपर्यंत जनसामान्य लोकांसाठी सामाजिक काम करत आहे.येणार्‍या काळातही निस्वार्थ भावनेने आपण आपल्या मित्र मंडळाच्या सहकार्यातून काम चालू ठेवू.अनेक रक्तदान शिबीर आणि नेत्र तपासणी शिबीर आमच्या मित्र मंडळाकडून घेण्यात आल्याचे हि गर्जे शेवटी म्हणाले.श्रीराम मित्र मंडळ, गोल्डन ग्रुप, मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रम हाती घेऊन पूर्ण सप्ताहत हे उपक्रम साजरे केले.

COMMENTS