Homeताज्या बातम्यामनोरंजन

अमिताभ बच्चन यांची नात आराध्याने दिल्ली हायकोर्टात याचिका केली दाखल

बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे कुटुंब बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय कुटुंब आहे. या कुटुंबातील सर्वात गोंडस मुलगी म्हणजे आराध्या बच्चन

नागपुरात भावी डॉक्टरची आत्महत्या
धनंज येथील सात एकर मधील सोयाबीन पीक करपले
दत्तक मुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या पुसद येथील घटना I LOKNews24

बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे कुटुंब बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय कुटुंब आहे. या कुटुंबातील सर्वात गोंडस मुलगी म्हणजे आराध्या बच्चन आराध्या कायमच चर्चेत असते. सध्या आराध्या चर्चेत आली आहे ते तिने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे. युट्यूब चॅनलवर आराध्याच्या तब्येतीची चुकीची माहिती दिल्याच्या विरोधात आराध्याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चनने उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणाबद्दल बोलताना आराध्याने सांगितलं की, काही युट्यूब आणि वेबसाईटवरून आराध्याच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. प्रकृतीबद्दल चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अशा युट्यूब चॅनेलवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

COMMENTS