Homeताज्या बातम्यामनोरंजन

अमिताभ बच्चन शुटिंग दरम्यान जखमी

उपचारासाठी रुग्णालयात दाखल

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांना वेगवेगळे किस्से सांगत असतात. अमिता

लोकन्यूज २४ Live : दुपारच्या बातम्या… महाराष्ट्रातील महत्वाच्या घटनांचा आढावा… (Video)
सिद्धिविनायक मंदिरच्या अध्यक्षपदी आमदार सदा सरवणकर
महाराष्ट्रातच इन्कम आणि टॅक्स आहे काय?; संजय राऊतांचा भाजपला सवाल | LOKNews24

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांना वेगवेगळे किस्से सांगत असतात. अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक ब्लॉग शेअर केला आहे. अमिताभ बच्चन यांना शूटिंग दरम्यान दुखापत झाली आहे.  त्यांच्या बरगड्यांना गंभीर इजा झाली आहे. प्रोजेक्ट के या चित्रपटासाठी बच्चन अनेक दिवसांपासून हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये शूटिंग करत आहेत. शनिवारी दुपारी एका शॉट दरम्यान त्यांना गंभीर दुखापत झाली. हैदराबादमध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना एअर अॅम्बुलन्सनं मुंबईला हलवण्यात आलं. सध्या ते त्यांच्या जलसा या निवासस्थानी आराम करत आहेत.  अमिताभ बच्चन यांचा हा ब्लॉग वाचल्यानंतर अनेकांनी बिग बींच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 

COMMENTS