अमित शाहांचा ताफा जाण्यासाठी भररस्त्यात रुग्णवाहिकेला अडवलं

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमित शाहांचा ताफा जाण्यासाठी भररस्त्यात रुग्णवाहिकेला अडवलं

रुग्णवाहिकेत कुणीही रुग्ण नव्हता असे पोलिसांचे स्पष्टीकरण

मुंबई प्रतिनिधी/ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांचा ताफा जातानाचा मुंबईतील एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा ताफा जाताना एक रुग

राज्यांसाठी आपत्ती निवारण निर्माण प्रकल्पांना मंजुरी
लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची घोषणा  
नक्षल्यांना रोखण्यासाठी मास्टर प्लॅन… मुख्यमंत्र्यांनी मागितला १२०० कोटींचा निधी

मुंबई प्रतिनिधी/ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांचा ताफा जातानाचा मुंबईतील एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा ताफा जाताना एक रुग्णवाहिकाही पोलिसांनी अडवली होती, असं व्हिडिओमध्ये दिसतंय. यावरुन सोशल मीडियात चर्चांना उधाण आलं होतं. अखेर पोलिसांनीही या व्हायरल व्हिडीओवर आपलं म्हणणं मांडलं आहे. या रुग्णवाहिकेत कुणीही रुग्ण नव्हता, असेही पोलिसांनी म्हटलं. तांत्रिक बिघाडामुळे रुग्णवाहिकेचा सायरस बंद होत नव्हता. त्यामुळे रुग्णवाहिकेचा सायरस सुरुच असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून आलंय. याबाबत रुग्णवाहिका चालकाचाही जबाबब लवकरच नोंदवून घेतला जाईल, असंही पोलिसांनी म्हटलंय.

COMMENTS