Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबादासशेठ नाईकवाडी यांचे निधन

अकोले/प्रतिनिधी ः अकोले शहरातील लक्ष्मी उद्योग समूहाचे संचालक श्री.अंबादासशेठ मार्तंड नाईकवाडी (वय-85,रा.अकोले)यांचे अल्प आजाराने आज बुधवारी सकाळ

भंडारदरा व निळवंडेच्या आवर्तनातील पाण्याची नासाडी
Ahmednagar : जिल्ह्यातील लॉकडाउनला विरोध…भाजप आमदारांच्या भागात कडक लॉकडाउन (Video)
वकील संघटनेने करोना संकटात केलेले मदत व जागृतीचे कार्य अभिनंदनास्पद : जिल्हा न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर

अकोले/प्रतिनिधी ः अकोले शहरातील लक्ष्मी उद्योग समूहाचे संचालक श्री.अंबादासशेठ मार्तंड नाईकवाडी (वय-85,रा.अकोले)यांचे अल्प आजाराने आज बुधवारी सकाळी 10 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, सहा मुली, सून, भाऊ, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर दुपारी येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आर्कि. चेतन नाईकवाडी,संगीता थोरात,अनिता दंडवते, सुनीता तळेकर,आशा पानसरे,सरला चौधरी, राजश्री माने यांचे ते वडील होत. माजी नगराध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी यांचे ते सासरे होत.भीमराज नाईकवाडी यांचे ते बंधू तर बाळासाहेब नाईकवाडी, सचिन नाईकवाडी यांचे ते चुलते होत. भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ यांचे ते व्याही होते.

COMMENTS