कोल्हापूर : राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आ
कोल्हापूर : राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या मूर्तीच्या संवर्धनाबाबत तज्ज्ञ समितीने 8 पानी अहवाल न्यायालयाला दिला आहे. यात देवीच्या मूर्तीवर अनेक भागात तडे गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेषत: मूर्तीच्या गळ्याखालील भागाची मोठी झीज झाली असल्याचे अहवालात म्हटले असून मूर्तीचे तातडीने संवर्धन करणे गरजेचे असल्याचे मत देखील व्यक्त करण्यात आले आहे.
कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरातील अंबाबाई देवीच्या मृती संवर्धना बाबत न्यायालयाने तज्ज्ञ समितीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. अंबाबाई महालक्ष्मी मूर्ती संवर्धनासंबंधीचा दावा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्यासमोर सुरू आहे. या बाबत गजानन मुनीश्वर व इतरांनी मूर्तीची पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकार्यांकडून पाहणी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार न्यायलयाने तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुरातत्व खात्याचे निवृत्त अधिकारी आर. एस. त्र्यंबके आणि विलास मांगीराज यांनी 14 व 15 मार्च रोजी मूर्तीची पाहणी केली होती. या पाहिणीचा अहवाल न्यायालयात त्यांनी सादर केला.
COMMENTS