जामखेड/प्रतिनिधी ः मतदारसंघातील शैक्षणिक व आरोग्याविषयी कामात तडजोड करणार नाही. मतदारसंघातील मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी देशातील
जामखेड/प्रतिनिधी ः मतदारसंघातील शैक्षणिक व आरोग्याविषयी कामात तडजोड करणार नाही. मतदारसंघातील मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी देशातील अग्रगण्य असलेल्या अॅमेझॉन या कंपनीशी कर्जत जामखेड मतदारसंघातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देण्यासाठी संलग्न केले आहे. जामखेड शहरातील खर्डा चौकातील उर्दू शाळेला आमदार रोहित पवार व अॅमेझॉन कंपनीच्या संयुक्त विद्यमाने 13 कॉम्पुटरसह सुसज्ज लॅब उपलब्ध करून दिली आहे. या कॉम्पुटर लॅबच्या उद्घाटनप्रसंगी आमदार रोहित पवार बोलत होते.
पुढे बोलतांना, आमदार रोहित पवार म्हणाले की, या उर्दू शाळेला 121 वर्षाचा इतिहास आहे. या शाळेतून ऐकेकाळी शिक्षण घेतलेले विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. या ठिकाणी हिंदू मुस्लीम समाजाचे लोक एकत्र शिक्षण घेत होते. या ऐतिहासिक शाळेची आत्याधुनिक शैक्षणिक साहित्य सुविधांसह लवकरच मोठी इमारत उभी करण्यास आपण प्रयत्न करणार आहे. या शाळेला शैक्षणिकदृष्टया सर्वोपरी मदत करणार असल्याचे आ रोहित पवार यांनी आश्वासन दिले. अॅमेझॉन कंपनीचे तज्ज्ञ साफ्टवेअर काँम्पुटरचे कोडींग प्रशिक्षण जामखेडला येऊन देणार आहेत. मुलांचा शाळेत जास्त वेळ जातो तो कारणी लागण्यासाठी शिक्षक व स्कुल समिती संयुक्त मेहनत घेत आहेत. दरम्यान उर्दू शाळेतील मुलींनी आमदार रोहित पवार यांना राख्या बांधल्या. आमदार रोहित पवार हे स्वतःच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील मूलांना आमदार रोहित पवार यांच्यावतीने एक भेट वस्तू देण्यात येणार आहे. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, कलीमोद्दीन कुरैशी, अमोल गिरमे, बिलाल शेख, सरपंच बापुसाहेब कारले, चांद तांबोळी, राहूल उगले, अझहरखान यांच्यासह पालक विद्यार्थी व राजकिय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्याध्यापक शाकीर शेख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच आमदार रोहित पवार यांच्याकडे शाळेसाठी काही बाबींची मागणी केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शाकीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली फिरोज पठाण, शकील बागवान, हनिफा मँडम बाजी, फरिदा मॅडम यांनी परिश्रम घेतले.
COMMENTS