Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणेवाडी येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न 

निघोज - तब्बल २७ वर्षानंतर पुणेवाडीतील भैरवनाथ विद्यालय पुणेवाडी येथील शैक्षणिक वर्ष १९९५-९६ मधील  माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी  मोठ

शिक्षकांनी सर्वोत्कृष्ट बनून विद्यार्थ्यांच्या मनात जिद्द निर्माण केली पाहिजे : डॉ.सर्जेराव निमसे
*SPECIAL REPORT: मा. आ. चरण वाघमारे यांचा सरकारला ‘१७० कोटींचा’ सल्ला | LokNews24*
श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना प्रतिष्ठेच्या ‘स्कॉच’ राष्ट्रीय पुरस्कार

निघोज – तब्बल २७ वर्षानंतर पुणेवाडीतील भैरवनाथ विद्यालय पुणेवाडी येथील शैक्षणिक वर्ष १९९५-९६ मधील  माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी  मोठ्या आनंदात व उत्साहात संपन्न झाला. संत निरंकारी भवन पुणेवाडी येथे आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यास विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.गवळी सर, सेवानिवृत्त शिक्षक मा.श्री.गोसावी सर,मा.श्री.चौधरी सर, कार्यरत शिक्षक मा.श्री.आवारी सर, मा.श्रीम.पुजारी मॅडम, तसेच मा. श्री.शिंदे , श्री.राजू पुजारी इ.सेवकवृंद व बॅचमधील विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. गवळी सर यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली .

सर्वप्रथम उपस्थित गुरुजनांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. तद्नंतर शाळेतील दिवंगत शिक्षक श्री हारदे सर व बॅचमधील दिवंगत विद्यार्थी रमेश बोरुडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. बॅचतर्फे उपस्थित गुरुजनांचा यथोचित सन्मान करण्यात आला व भेटवस्तू देण्यात आली. तर बॅचमधील प्रथम वर्ग अधिकारी पदावर असलेले श्री. बाळू बोरुडे, सरपंच पदावर असलेल्या पुष्पा दुश्मान तसेच बॅचमधील कुसूम रेपाळे यांचे पती राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक मा.श्री.बन्सी मंजाभाऊ गुंड सरांचा  मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्वागत सोहळ्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने आपापली ओळख करून दिली व मनोगत व्यक्त केले. मनोगतात प्रत्येकाने प्राथमिक व माध्यमिक शाळेतील आपापले अनुभव कथन केले. तसेच शिक्षकांविषयीच्याही आठवणी सांगितल्या. तसेच  बॅचतर्फे विद्यालयाच्या चारही बाजूंनी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचा मानस श्री प्रदीप बोरुडे यांनी सर्वांच्या संमतीने व्यक्त केला.

मान्यवरांपैकी श्रीम. पुजारी मॅडम यांनी बरेच विद्यार्थी आपल्या आजही संपर्कात आहेत असे सांगितले.  सुंदर नियोजन व आयोजनाबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या. श्री. आवारी सर यांनी प्रत्येक विद्यार्थ्याबाबतचे अनुभव कथन केले व आठवणींवर आधारित एक गाणे सर्वांना ऐकवले. श्री चौधरी सर यांनी त्या वर्षातील मराठीच्या कविता गाऊन दाखवल्या. पाठांच्या आठवणी करून दिल्या व विद्यार्थ्यांच्या आठवणी सांगितल्या. वर्गशिक्षक श्री. गोसावी सर यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांबाबतचे अनुभव कथन केले, तसेच स्नेहसंमेलन व शैक्षणिक सहलीविषयींचे अनुभव सांगितले.  श्री गवळी सर यांनी कार्यक्रमाच्या सुंदर नियोजनाबाबत सर्वांना शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांच्या प्रगती बाबत समाधान व्यक्त केले.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गुलाब चेडे यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री. प्रदीप बोरुडे यांनी केले. अशाप्रकारे अत्यंत खेळीमेळीच्या ,आनंदमय व उत्साहवर्धक  वातावरणात स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

COMMENTS