Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार अपघातातील आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार

डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर या दोघांना अटक

पुणे ः पुण्यातील कार अपघात प्रकरण चांगलेच गाजतांना दिसून येत आहे. या अपघातामध्ये उद्योगपतीच्या मुलाने कारने दोघांना उडवले होते, यात त्या दोघांचा

कुंतलगिरीचा पेढा खाल्ल्याने आहेर वडगाव येथील 15 जणांना विषबाधा
… तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल – नवाब मलिक
जिल्हा परिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

पुणे ः पुण्यातील कार अपघात प्रकरण चांगलेच गाजतांना दिसून येत आहे. या अपघातामध्ये उद्योगपतीच्या मुलाने कारने दोघांना उडवले होते, यात त्या दोघांचा मृत्यू झाला होता. शिवाय अल्पवयीन 17 वर्षांच्या आरोपीच्या वयावर देखील आता प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. त्याचबरोबर आरोपीचा ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचे समोर आले आहे. आरोपीचे ब्लॅड सम्ॅपल कचरापेटीत फेकण्यात आले होते, त्याजागी दुसर्‍याचे ब्लड सम्पॅल देण्यात आले होते. याप्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हाळनोर या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री उशीरा अटक केली आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
ड्रग तस्कर ललीत पाटील प्रकरणात देखील ससून रुणालयातील डॉक्टर आणि कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता दोन डॉक्टरांना या प्रकरणात अटक करण्यात आल्याने आरोग्य विभागातील भ्रष्टाचार समोर आला आहे. त्यामुळे ससून रुग्णालयाच्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या प्रशासनावर अनेक प्रश्‍न उपस्थित होवू लागले आहेत. विविध ताशेरे ससून रुग्णालयावर ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणात अडकले असताना, ससून प्रशासनाने धडा न घेतल्याने डॉक्टरांना पोलीस कारवाईस सामोरे जावे लागत आहे. आता परत एका गंभीर प्रकरणात दोघा डॉक्टरांना अटक झाली असल्याने डॉक्टर, पोलिस आणि आरोपी यांच्यातील साटेलोटे उघडकीस आले आहे. किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणामध्ये देखील ससूनमधील प्रत्यारोपण समिती स्थगित करण्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागानेघेतलेल्या निर्णयवेळी ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना निलंबित करण्यात आले होते. डॉ तावरे हे ससून रुग्णालयाचे अधीक्षक आणि विभागीय अवयव प्रत्यारोपण मान्यता समितीचे अध्यक्ष असताना किडनी तस्करी प्रकरण उघडकीस येऊन त्यांचे कारनामे उघडकीस आले होते. आता कल्याणीनगर अपघात प्रकरणात मुलाचा ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी त्यांनी नेमके किती पैसे घेतले जे पोलिस तपासात उघडकीस येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

COMMENTS