Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रामगिरीजी महाराजांसह संत कौस्तुभ आणि स्वप्ना जाधव नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित

कोपरगाव शहर ः महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने नुकतेच शिर्डी येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात गोदावरी धाम सरला बेटाचे मठाधिप

नेवाश्यात अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई
तीन हजार रुपयांसाठी नातवाकडून आजोबांची हत्या | DAINIK LOKMNTHAN
स्नेहसंमेलनामधून मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो ः अनिता उगले

कोपरगाव शहर ः महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने नुकतेच शिर्डी येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात गोदावरी धाम सरला बेटाचे मठाधिपती प.पु. रामगिरीजी महाराज यांचा संत कौस्तुभ तर कोपरगाव येथील बाल मानस शास्त्र तज्ञ स्वप्ना मनिष जाधव यांना बाल मानसशास्त्र क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल महिला दिनानिमित्त नारीशक्ती सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी मोठ्या दिमाखात वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या मान्यवरांचा सन्मान करण्यात येत असतो याही वर्षी त्याच अनुषंगाने राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्‍वासराव आरोटे यांच्या संकल्पनेतुन  शिर्डी येथे राज्य पत्रकार संघाच्या वतीने गोदावरी धाम सरला बेटाचे मठाधिपती प.पु. रामगिरीजी महाराज यांना संत कौस्तुभ पुरस्कार 2024 देऊन गौरविण्यात आले तर कोपरगाव येथील राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष मनीष जाधव यांच्या पत्नी स्वप्ना जाधव या बाल मानसशास्त्र क्षेत्रात करत असलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल नारीशक्ती सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्‍वासराव आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार, पत्रकार संघाचे उत्तर नगर प्रमुख अनिल राहणे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार जनार्दन जगताप, व्याख्याते प्रदीप कदम, प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव, पत्रकार संघाचे नवी मुंबई विभागीय अध्यक्ष दशरथ चव्हाण, साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, कोपरगाव तालुकाध्यक्ष मनिष जाधव, कोपरगाव तालुका उपाध्यक्ष फकिरराव टेके, कोपरगाव तालुका कार्याध्यक्ष विजय कापसे, सदस्य काकासाहेब खर्डे,  राहुल फुंदे, आदी राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक करत सर्वाना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS