Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागा वाटपांचे सर्वाधिकार फडणवीसांना

भाजप त्यांच्याच नेतृत्वाखाली लढणार विधानसभा

मुंबई ः भाजपचे अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चा मध्यंतरी सुरू असल्यामुळे फडणवीस यांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्य

’वन नेशन, वन इलेक्शन’च्या हालचालींना वेग
 पंढरपुरात नरेंद्र मोदी यांची प्रतिमा आणि टायर जाळत काँग्रेस आक्रमक 
शिवांकुर विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात

मुंबई ः भाजपचे अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चा मध्यंतरी सुरू असल्यामुळे फडणवीस यांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता होती. मात्र आगामी विधानसभा निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली लढण्यात येणार असून, विधानसभेसाठी उमेदवार निवडण्याचे अधिकार देखील फडणवीस यांनाच देण्यात आल्याची माहिती भाजपचे नेते तथा आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र विधानसभेचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत आगामी लोक विधानसभा निवडणुकीसंदर्भात तयारीचा आढावा तसेच नियोजनाबाबत महत्त्वाची चर्चा करण्यात आली. यामध्येफडणवीस यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात कोणत्या उमेदवाराला कोणत्या मतदारसंघातून तिकीट द्यायचे, याचा निर्णय फडणवीस घेणार आहेत. महायुतीमध्ये जागावाटपात देखील महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. या संदर्भातले सर्वाधिकार हे देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले असल्याचे शेलार यांनी सांगितले आहे. महायुतीमध्ये सर्व पक्षांचे नेतृत्व आणि जागावाटप करण्याचा निर्णय झाला आहे. आमच्या सर्व मित्र पक्षांसोबत बैठक होणारच आहेत. या बैठकीमध्ये जागा वाटपाचा निर्णय आणि पुढील भविष्यामध्ये उमेदवार निश्‍चित करण्याचा निर्णय देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पक्ष घेणार असल्याचे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले आहे. आगामी काळात विधानसभेत महायुतीचा विजय निश्‍चित असल्याचा विश्‍वास देखील त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS