श्रीनगर ः जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरूवात झाली आहे. काश्मीरमध्ये काँगे्रस आणि नॅशनल कॉ
श्रीनगर ः जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरूवात झाली आहे. काश्मीरमध्ये काँगे्रस आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्र निवडणूक लढणार आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा केली.
ते म्हणाले, जागांचे वाटप नंतर ठरवले जाईल. तत्पूर्वी, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी श्रीनगरमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना सांगितले की, जम्मू-काश्मीरचे प्रतिनिधित्व करणे आणि त्याला राज्याचा दर्जा मिळवून देणे सर्वात महत्त्वाचे आहे. इथून माझे रक्ताचे नाते आहे. अशा परिस्थितीत जनता आम्हाला निवडणुकीत नक्कीच साथ देईल, अशी आशा आहे. राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, लोकसभा निवडणुकीत आम्ही पंतप्रधान मोदींचा आत्मविश्वास तोडला आहे. आता त्यांची छाती 56 इंच राहिलेली नाही. ते वाकलेले खांदे घेऊन चालतात. जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत युती तेव्हाच होईल, जेव्हा सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचा आदर केला जाईल. जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत आपण जिंकलो तर संपूर्ण भारतात आपल्याला यश मिळेल, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. राहुल आणि खरगे जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौर्यावर आहेत. 21 ऑगस्टच्या संध्याकाळी दोन्ही नेते श्रीनगरला पोहोचले. दुसर्या दिवशी दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली.
COMMENTS