नाशिक- रुग्णसेवेत स्वतःला झोकून देतांना आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्याचा प्रयत्न अनेक डॉक्टरांच्या माध्यमातून होतो आहे. गेल्या अनेक वर्षां

नाशिक- रुग्णसेवेत स्वतःला झोकून देतांना आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्याचा प्रयत्न अनेक डॉक्टरांच्या माध्यमातून होतो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असेच योगदान देणाऱ्या ज्येष्ठ डॉक्टरांचा आज सत्कार होत आहे. यातून सर्व समाज घटकांना चांगले काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रचे नियोजित अध्यक्ष डॉ. दिनेश ठाकरे यांनी केले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेतर्फे डॉक्टर्स डेचे औचित्य साधून शालिमार येथील आयएमए सभागृहात जीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात डॉ.ठाकरे बोलत होते. यावेळी आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ.विशाल गुंजाळ, सचिव डॉ.माधवी गोरे-मुठाळ, उपाध्यक्षा डॉ.मनिषा पवार, खजिनदार डॉ.पंकज भट, नियोजित अध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा यांच्यासह पुरस्कारार्थी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. ठाकरे पुढे म्हणाले, डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यासाठी आयएमए कटिबद्ध आहे. आरोग्य व्यवस्था पुरविणाऱ्या डॉक्टरांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी आयएमएतर्फे विविध योजना उपलब्ध आहेत. असे सांगत या योजनांची माहिती त्यांनी उपस्थित डॉक्टरांना दिली.
प्रास्ताविक करतांना डॉ.विशाल गुंजाळ म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मयोगी व्यक्तींचा आज सत्कार होतो आहे. निवड समितीने परिश्रम घेत या पुरस्कारांची निवड केली. डॉक्टर्स डे हा आपल्यासाठी स्वाभिमान दिवस आहे. आयएमएचे कामकाज कॅशलेस, डिजिटल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विक्रमी ३५ लाइफ मेंबर नुकतेच झालेले आहेत.
कार्यक्रमात परिचय डॉ.मनिषा जगताप यांनी करुन दिला. सूत्रसंचालन डॉ.शलाका बागूल व डॉ.प्रेरणा शिंदे यांनी केले. आभार डॉ.माधवी गोरे-मुढाळ यांनी मानले. पुरस्कार निवड समितीचे सदस्य डॉ.प्रशांत देवरे, डॉ.हेमंत सोननीस, डॉ.अनिरुद्ध भांडारकर यांच्यासह आयएमएचे सदस्य उपस्थित होते. दरम्यान डॉक्टर्स डे निमित्त सकाळी रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात डॉक्टर त्यांचे कुटुंबीय यांसह इतरांनी सहभागी होत रक्तदान केले. तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाचेही आयोजन यावेळी केले होते.
जीवन गौरव पुरस्कारार्थी- कार्यक्रमामध्ये डॉक्टरांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये डॉ. युवराज पवार, डॉ. पूनम शिवदे, डॉ. यतींद्र दुबे, डॉ. अभय सुखात्मे, डॉ. तुषार देवरे, डॉ. संजय वेखंडे यांचा समावेश होता.
COMMENTS