अहमदनगर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी होणार : जिल्हाधिकारी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी होणार : जिल्हाधिकारी

अहमदनगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्‍वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात तब्बल 80च्यावर विद्यार्थी व शिक्षक कोरोनाबाधित आढळल्याने जिल्ह्या

नेवाशातील आत्मदीप हॉस्पिटलमध्ये आज मोफत तपासणी शिबीर
रिक्षांना लागणार चालकाची माहिती असणारे स्टीकर
मनपा करणार एका प्रभागात मीटरद्वारे पाणीपुरवठा ; यंदाचे अंदाजपत्रक 802 कोटींचे, नवी करवाढ नाही

अहमदनगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्‍वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात तब्बल 80च्यावर विद्यार्थी व शिक्षक कोरोनाबाधित आढळल्याने जिल्ह्यातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले आहेत. जिल्हा व आरोग्य प्रशासनाकडून लवकरच यादृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे.
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्‍वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थी व शिक्षक मिळून 83जण कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. या विद्यार्थ्यांना पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जे विद्यार्थी स्वस्थ आहेत त्यांना शाळेतच क्वारंटाईन करण्यात आले आहे. या शाळेचा परिसर नो एंट्री झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून या ठिकाणी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांचे एक पथक विद्यार्थ्यांची देखरेख करण्यासाठी ठेवण्यात आले आहे. येथील सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असल्याचे प्रशासनाद्वारे सांगितले जात आहे.

त्यांची तपासणी सुरू
टाकळी ढोकेश्‍वरच्या जवाहर नवोदय विद्यालयात कोरोनाबाधीत विद्यार्थी व शिक्षक सापडल्याने जिल्ह्यात समाज कल्याण विभागातर्फे जी वसतिगृहे आणि शाळा चालवल्या जात आहेत, तेथील तीन हजार विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील हे काम होत असताना जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी शाळांमधील मुख्याध्यापकांना त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचणी करण्याचा सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली.

COMMENTS