Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी शेतकऱ्यांच्या भेटीला शेतात

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील अधिकारी आज शेताच्या बांधावर पोहोचले. शेतकऱ्यांशी बोलले. खरीप हंगामाच्या तयारीविषयी चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी

हरीबाबा देवस्थानला “क” वर्ग  दर्जा मिळून दिल्याबद्दल आ. सत्यजित तांबे यांचा सत्कार
शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना ग्रामपातळीवर पोहोचवा- पालकमंत्री शिरसाट
गोविंद तांडा येथील  शेतकर्‍यांची आत्महत्या
May be an image of 12 people and grass

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील अधिकारी आज शेताच्या बांधावर पोहोचले. शेतकऱ्यांशी बोलले. खरीप हंगामाच्या तयारीविषयी चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत असा धीरही दिला. आज जिल्ह्यातील शेतांच्या बांधा बांधावर असा शेतकरी- अधिकारी सुसंवाद होतांना दिसला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

May be an image of 12 people and tree

अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावरी हाउपक्रम जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. शेतकऱ्यांना खरिप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे शंका समाधान,बी बियाणे,खते त्याचप्रमाणे पीककर्ज प्रक्रिया, शेतरस्ता, इत्यादी विषयावरील तक्रारीवरील शंका, समाधान करण्यासाठी अधिकारी बांधावर गेले. आजपासून हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हाधिकारी स्वामी हे स्वतः लक्ष्मण खंडेराव रहाणे, गट नं १२ नांदगाव ता. वैजापूर या शेतकऱ्याच्या शेतात गेले होते. महसूल, ग्रामविकास, कृषी विभाग, भूमी अभिलेख, विविध बॅंकांचे अधिकारी यात सहभागी झाले.

या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या अडीअडचणी कार्यालयात घेऊन येण्याऐवजी प्रत्यक्ष त्यांच्याकडेच जाऊन त्यांच्या बांधावर अधिकाऱ्याने अडचणी सोडवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या शेत रस्ता, इतर सुविधा, मालकी हक्क, फेरफार, खत ,बी – बियाणांची उपलब्धता याविषयी संवाद साधला जाणार आहे.यामध्ये महसूल, कृषी ग्रामविकास, सहकार, भूमी अभिलेख,वन विभाग या विभागाचे सर्व अधिकारी तालुकानिहाय नियोजन करून किमान प्रत्येकी १० शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी देणार आहेत.या भेटीदरम्यान शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रमुख उद्देश असल्याचे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आले आहे. गावोगावी भेटी घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून त्या सोडविण्यात याव्यात असे निर्देशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

COMMENTS