Homeताज्या बातम्यासंपादकीय

सर्वच आता निवडणूकमय ! 

 दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची पहिल्यांदाच खुल्या मैदानावर सभा झाली. देशातील दोन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि हेमंत यांच्या अ

पतंजली ला झटका!
कायदा नसतानाच होतेय डि-लिस्टींग !
वेगळा आणि विरळा अभिवादक! 

 दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची पहिल्यांदाच खुल्या मैदानावर सभा झाली. देशातील दोन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि हेमंत यांच्या अटकेच्या विरोधात जरी ही  महारॅली असली तरी, प्रत्यक्षात ती इंडिया आघाडीची देशाला संबोधन करणारी रॅली होती, यात मात्र वाद नाही. दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी मधून बाहेर पडलेल्या ममता बॅनर्जी यांची देखील पश्चिम बंगाल मध्ये महुवा मोईत्रा  यांच्या प्रचारासाठी सभा झाली. या सभेमध्ये ममता बॅनर्जी यांनी थेट आरोप लावला की, काँग्रेस आणि डावी आघाडी या दोघांनीही पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला साथ दिली आहे; पण, त्याच वेळी त्या हे देखील वक्तव्य करतात की, भारतीय जनता पक्ष देशात २०० पेक्षा अधिक जागा मिळवू शकत नाही. तर इकडे राहुल गांधी यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व यंत्रणा ताब्यात घेतल्या तरीही, १८० जागांच्या पुढे ते जाऊ शकत नाही, असे ठामपणे म्हटले आहे. तर, महाराष्ट्रामध्ये अजूनही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या उमेदवारांची नावे ठरत नसल्याचे वारंवार समोर येत आहे. त्यातच महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेकांना विचारात न घेताच उमेदवारांची मतदारसंघनिहाय नावे जाहीर करतात; तर, दुसऱ्या बाजूला महायुतीतील पक्ष देखील अशा प्रकारची नावे जाहीर करण्याची प्रक्रिया करतात. यातून महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही परस्परविरोधी असलेल्या आघाड्यांमध्ये असणारा संघर्ष अधिक तीव्र तर असल्याचा दिसतो; पण, त्याचवेळी महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने उचललेले स्वतंत्र पाऊल हे निवडणुकांवर किंवा महाविकास आघाडीच्या विजयावर परिणाम करेल, अशी वक्तव्य वारंवार महाराष्ट्रातून ऐकायला येत आहेत.

तर, दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी देखील महाविकास आघाडीवर टीका करताना सामाजिक न्यायाचे अनेक मुद्दे चर्चेला आणलेले आहेत. निर्भय बनो’ कार्यकर्त्यांनाही त्यांनी अतिशय आक्रमक शब्दात सुनावले आहे. अर्थात, देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असताना, आता राष्ट्रीय पातळीवर अनेक प्रकारची आव्हाने सर्वच राजकीय आघाड्यांसमोर आहेत. अशावेळी महाराष्ट्रात ओबीसींचे राजकीय पक्ष देखील मैदानात उतरत आहेत. ओबीसींच्या राजकीय आघाड्या जर खरोखर मैदानात ताकदीनिशी उतरल्या, तर, त्याचा निश्चितपणे जो परिणाम आहे तो महायुती आणि महाविकास आघाडी यांची मते कमी करण्यावर होईल. या युती आणि आघाड्यांचं सर्वच पक्षांच्या दृष्टीने महत्त्व आहे. अर्थात, ओबीसी राजकीय आघाडीने यापूर्वीच महाराष्ट्रात ३० जागांवर लढत देण्याचे मुंबई येथील पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक मतदारसंघात उमेदवार त्या त्यावेळी आपले अर्ज भरतील आणि महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण ताकदीनिशी उतरतील, याची खात्री आता ओबीसी राजकीय आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पूर्णपणे आली आहे. महाराष्ट्रातील राजकीय लढती या बहुरंगी होतील, यात आता शंका उरली नाही. पाहायचे एवढेच आहे की, महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये विजयाचे जे परिणाम येतील, ते महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत पुढे कसे जातील! अर्थात, लोकसभा निवडणुकीनंतर आगामी ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या देखील निवडणुका आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनेच लोकसभा निवडणुका लढविल्या जातील, हे आता स्पष्ट आहे.

COMMENTS