कोपरगाव शहर प्रतिनिधी : संविधानातील घटनेप्रमाणे ओबीसींना आरक्षण मिळालेले असताना आज आपल्या सवलती शुन्य झाल्या आहेत हा ओबीसींवर अन्याय आहे. यातून न्याय
कोपरगाव शहर प्रतिनिधी : संविधानातील घटनेप्रमाणे ओबीसींना आरक्षण मिळालेले असताना आज आपल्या सवलती शुन्य झाल्या आहेत हा ओबीसींवर अन्याय आहे. यातून न्याय मिळविण्यासाठी सर्वांनी एका छताखाली येण्याची गरज आहे. एकञ येवुन लढलो तर आरक्षणापासुन कुणीही रोखु शकणार नाही यासाठी युक्ती व शक्तीचा देखील वापर करु हक्काचे आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी सर्व जातींनी खंब्बीरपणे समता परिषदेचे संस्थापक माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांचे पाठीशी उभे राहण्याची वेळ आली आहे हे लक्षात घेवून सर्वांनी एकत्र या असे आवाहन समता परीषदेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य व माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांनी केले.
कोपरगांव येथील माळी बोर्डींग येथे आरक्षण ओबीसी चे यावर चर्चासञ व विशेष बैठक सर्व ओबीसी समाज बांधवांच्या उपस्थितीत आयोजित केली होती त्याप्रसंगी समता परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य पदमाकांत कुदळे मार्गदर्शन करतांना बोलत होते. पद्माकांत कुदळे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ओबीसीं मध्ये फूट पाडून ओबीसींना संपवण्याचा प्रयत्न प्रयत्न सुरू आहे त्यासाठी एकञ येवुन लढले पाहिजे 55 टक्के ओबीसी असताना देखील एकजूट होत नाही ओबीसींची वज्र मूठ बांधण्याची वेळ आता आली आहे घटना बदलून आरक्षण संपवण्याचा डाव सुरू आहे. ते विखुरलेले समाज सर्वजण एकत्र येण्यास तयार आहेत त्याच्या पर्यंत पोहचून सर्वांना एकत्र करण्याची वेळ आता आली आहे. ते दबलेले आवाज मोकळे करण्याची हिच वेळ आहे त्यामुळे सर्वांनी एकत्र या, एकाच छताखाली या आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आरक्षण वाचण्यासाठी एकजुटीने ओबीसींनी पुढे आले पाहिजे अन्यथा पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. ओबीसींचा इम्पिरिकल डेटा नाही तर मग त्यात सातशे चुका यांना कशा समजल्या ? हा खेळ थांबवा. इतरांना आरक्षण देण्यास आमचा कुठलाच विरोध नाही पण आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका. न्यायालयीन प्रक्रीयेच्या नावाखाली ओबीसींचे पाय छाटण्याचे काम सध्या सुरू आहे. आपल्याला डावलण्यासाठी संपुर्ण यंत्रणा कामाला लागलीय याचा विचार करा. आडनावावरून जात समजत नसते त्यासाठी घरोघरी जावून सर्व्हे करा आणी आमचे आरक्षण द्या असे आवाहन शेवटी पदमकांत कुदळे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक प्रभाकर ससाणे, बापु वढणे, बापुसाहेब इनामके, डा. तुषार गलांडे, संजय धानके, किरण थोरात, मुकुंद काळे, मनिष जाधव, संतोष शैलार, शंकर घोडेराव, राहुल देवळालीकर, डा. मनोज भुजबळ, महेश डोंगरे, दिनेश संत, गणेश लकारे, रजनीताई भुईर, निर्मलाताई भगत, स्वप्ना जाधव, अनिल भुईर, गिरीश हिवाळे, विजय वढणे, महेंद्र टोरपे, जितेंद्र टोरपे, शैलाश गाडेकर यांच्यासह आदि ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. सदर बैठकीचे सुञसंचालन मनिष जाधव यांनी केले तर आभार डा. तुषार गलांडे यांनी केले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना जाधव यांनी बोलतांना सांगितले की,आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सर्वांवर वाढली आहे. सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन एक सामाजिक चळवळ उभी करावी ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ यांनी फारमोठी किंमत मोजली आहे त्यांनी स्वतःच्या राजकारणासाठी नाही तर ती ओबीसी समाजासाठी ही मोठी किंमत मोजली आहे गावोगावी ओबीसी संघटन वाढले पाहिजे असे मत जाधव यांनी व्यक्त केले.
COMMENTS