Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतील चारही धरणे पावसामुळे ओव्हर फ्लो

मुंबई ः गेल्या काही महिन्यापूर्वी मुंबईकरांना पाणीटंचाईची भीषण समस्या भेडसावत होती. त्यातच ऐन पावसाळ्यात दहा टक्के पाणीकपात करण्यात आली होती. मात

मुंबई पुन्हा हादरली धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग
संजय राऊतांच्या पुणे दौरा शिवसेनेच्या पथ्थ्यावर…. अनेकांचे पक्षप्रवेश
बोगस क्रीडा प्रमाणपत्राआधारे 109 जणांनी लाटली सरकारी नोकरी

मुंबई ः गेल्या काही महिन्यापूर्वी मुंबईकरांना पाणीटंचाईची भीषण समस्या भेडसावत होती. त्यातच ऐन पावसाळ्यात दहा टक्के पाणीकपात करण्यात आली होती. मात्र आता मुंबईमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभरासाठीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सात धरणांपैकी चार धरणे रविवारी पुन्हा ओव्हर फ्लो झाली आहेत. या धरणांमधून मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सातही जलाशयांमधील पाणीसाठा 95.27 टक्क्यांवर पोहचला आहे. सध्या धरणक्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर या सातही जलाशयांमधील पाणीसाठा 100 टक्क्यांवर पोहचेल.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून शहापूर तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. यामुळे मुंबईसह इतर शहरांना पाणीपुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील मध्य वैतरणा, मोडकसागर आणि तानसा धरण तिसर्‍यांदा ओव्हर फ्लो झाले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या मोडकसागर धरणातून 14978 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मध्य वैतरणा धरणातून 8122 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर तानसा धरणातून 14368 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुंबई महानगर पालिकेने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सातही जलाशयांमधील पाणीसाठा 95 टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. 25 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सातही जलाशयांमधील पाणीसाठा 13,78,877 दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण 95.27 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये 12,39,541 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. म्हणजेच 85.64 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागच्यावर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी सातही धरणातील पाणीसाठा 10 टक्क्यांनी वाढला आहे. मुंबई शहर आणि उपनगराला 7 जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या 7 जलाशयांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये 5 धरण आणि 2 तलाव आहेत. यासातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या या सातही धरणांमध्ये 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. 

COMMENTS