Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवाजी विद्यापीठाच्या सर्व परिक्षा होणार ऑफलाईन एमसीक्यू ?

सातारा / प्रतिनिधी : ऑफलाईन एमसीक्यूच्या निर्णयानंतर विधीसह अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन शमलेले असतानाच उर्वरित अभ्यासक्रमाचे विद्यार्

पोलिसांनी अवैध व्यवसाय बंद न केल्यास भाजपा बंद करणार : धैर्यशील मोरे
कोरोनामुळे बैलगाडी शर्यतीवर बंदी : रामदास आठवलेंचा जावईशोध
पाटण तालुक्यात अल्पवयीन मतिमंद मुलीवर 8 जणांचा बलात्कार; संशयित महिलेसह आठजण पोलीस कोठडीत

सातारा / प्रतिनिधी : ऑफलाईन एमसीक्यूच्या निर्णयानंतर विधीसह अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन शमलेले असतानाच उर्वरित अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आता कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासनासोबत भांडू लागले आहेत. त्यामुळे आता उर्वरित अभ्यासक्रमाच्या परिक्षांबाबत लवकरच अध्यादेश पारित होईल, अशी चर्चा झाली. एकंदर गेल्या दोन महिन्यापासून एमसीक्यू की डिस्क्रीपटिव्ह पध्दतीने परिक्षा होणार याबाबत संभ्रमावस्था होती. त्यातून आता विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या प्रार्दुभाव होवू नये म्हणून गेल्या अडिच वर्षापासून ऑनलाईन एमसीक्यू पध्दतीने परिक्षा घेण्यात आल्या होत्या. तसेच महाविद्यालयातील शिक्षणही ऑनलाईन झाले होते. जानेवारी महिन्यापासून कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होत असल्याचे निष्कर्श आल्यानंतर अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरु झाली. मात्र, या कालखंडात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी वेतनवाढीसह विलीनीकरणाच्या मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन छेडले होते. याचा परिणाम सामान्य जनतेला अनेकदा नाहक त्रासास सामोरे जावे लागले. त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेवर विपरित परिणाम झाला होता. शिक्षण व्यवस्था कोलमडल्याने विद्यार्थ्यांच्या परिक्षांसह विविध प्रश्‍नांनी शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून दिले होते.
गेल्या काही दिवसापासून परिक्षा कशा होणार याकडे विद्यार्थ्यांच्या नजरा लागल्या होत्या. त्यामुळे राज्यभर आंदालने सुरु होती. राजकीय नेत्यांनी यामध्ये सहभाग घेतल्याने मात्र, वातावरण निवळण्याऐवजी बिघडण्यास मदत झाली. परिक्षांचा प्रश्‍न सुटण्याऐवजी तो जटील होण्याच्या दिशेने वाटचाल झाली. त्याचे खापर मात्र, विद्यापीठाच्या परिक्षा नियंत्रकांच्या डोक्यात फोडण्यात आले. या प्रकाराने अखेर विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र होत गेले. याचा सुवर्णमध्य काढत अखेर सोलापूर विद्यापीठापाठोपाठ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या कुलगुरुंना अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनास सामोरे जावे लागले. प्रारंभी विद्यापीठाने डिस्क्रपटीव्ह पध्दतीने होणार असल्याचे परिपत्रक काढण्यात आले होते. त्यानंतर मात्र, विद्यार्थी संघटना आक्रमक होताच शिवाजी विद्यापीठाने एक पाऊल मागे सरकत विधी व अभियांत्रिकीची परिक्षा ऑफलाईन एमसीक्यू पध्दतीने घेण्याचे परिपत्रक जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थ्यांच्या बाजूने आज निर्णय झाला असला तरी भविष्यात येणार्‍या अडचणींबाबत शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या अडीच वर्षापासून ऑनलाईन परिक्षा होण्याने परिक्षेचे गांभिर्य राहिले नसल्याबाबत चर्चा करत आहेत. तसेच काहींनी तर भविष्यात अशा प्रकारे घेतलेल्या शिक्षणाचा प्रत्यक्ष नियमित कामामध्ये उपयोग होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

COMMENTS