Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाजवी खर्चात सर्व विभागांनी कपात करावी; राज्य सरकारच्या सूचना

मुंबई : राज्यातील अर्थव्यवस्थेसमोर लाडकी बहीण योजनेचे मोठे आव्हान दिसून येत आहे. या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर सर्वात मोठा भार पडतांना दिसून येत आ

चांदोली परिसरात मुसळधार पाऊस; 110 मिलिमीटर पावसाची नोंद
व्हिडिओ तयार करून व्यावसायिकाची आत्महत्या
मायणीच्या यशवंत विकास सोसासटीत गुदगे गटाकडून येळगावकर गटाचा धुरळा

मुंबई : राज्यातील अर्थव्यवस्थेसमोर लाडकी बहीण योजनेचे मोठे आव्हान दिसून येत आहे. या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर सर्वात मोठा भार पडतांना दिसून येत आहे, त्यामुळे सरकारी अधिकारी, कर्मचार्‍यांचे वेतन, पायाभूत सोयी-सुविधांसाठी निधी, मोठ्या प्रकल्पांसाठी निधी यासारखे आर्थिक प्रश्‍न भेडसावतांना दिसून येत आहे, यावर उतारा म्हणून राज्य सरकारने सर्व विभागांना वाजवी खर्चात कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजना सुरू ठेवणे सरकारसमोर सर्वात मोठे आव्हान आहे. डिसेंबर महिन्याचा लाभ महिलांना मिळण्यास सुरूवात झाली आहे. या योजनेअंतर्गत दिल्या जाणार्‍या लाभामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडत आहे. याच कारणामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आलेल्या ताणानंतर राज्य सरकारकडून शासकीय खर्चावर कात्रीला सुरवात करण्यात आली आहे. नुकत्याच्या नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या खर्चात जवळपास 55 टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आकडेवारीतून पुढे आले आहे.

COMMENTS