Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रिपाइंच्या ईद-मिलाफने सर्वधर्मियांचा बंधुभाव जोपासला

बीड प्रतिनिधी - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बीड शहराच्या वतीने मंगळवार (दि.2) रोजी ईद-मिलाफचे आयोजन करण्यात आले होते. शहरील बशीरगंज चौक येथे हा सा

नवाब मलिकांचा बॉम्ब पवारांनी फुसका केलाय?
अजय बारसकर यांची प्रहारमधून हकालपट्टी
नगरसेविका तृप्ती घाडगे यांच्यावर तिघांनी हल्ला केला 

बीड प्रतिनिधी – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बीड शहराच्या वतीने मंगळवार (दि.2) रोजी ईद-मिलाफचे आयोजन करण्यात आले होते. शहरील बशीरगंज चौक येथे हा सामाजिक सलोख्याचा ईद-मिलाफ कार्यक्रम उत्साहात पार पडला. सदरील ईद-मिलाफ कार्यक्रम युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी आयोजित केला होता.या कार्यक्रमाला सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून बंधुभाव जोपासला. बीड रिपाइंकडून दरवर्षी सातत्याने समाजाचा बंधुभाव टिकवून ठेवण्यासाठी व एकतेचा संदेश देण्यासाठी ईद-मिलाफचे आयोजन केले जाते.
रमजान ईदचे औचित्य साधून हिंदू,मुस्लिम एकतेचा संदेश देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात पप्पू कागदे यांनी सर्व धर्मियांच्या बंधूभाव जोपासला. पप्पू कागदे गेल्या अनेक वर्षांपासून ईद-मिलाफच्या कार्यक्रमातून शांततेचा व समतेचा संदेश देतात. राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे काम करीत समतेच्या संदेशाचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचे काम करत आहेत.  या कार्यक्रमास भन्ते धम्मशील थेरो, मौलाना जाकेर साहब, मौलाना बाकी साहब, मुफ्ती मोहियोद्दीन, हाफिज वासेख साहब, हाफिज जुनेद साहब, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संचिन पांडकर, न.प मुख्याधिकारी नीता अंधारे, माजी मंत्री सुरेश नवले, विजयसिंह पंडित, राजेंद्र जगताप, सिराज देशमुख, जनार्धन तुपे, अनिल जगताप, शेख शफिक भाऊ, शेख निजाम, शेख तय्यबभाई, मोईन मास्टर, अशोक लोढा, फारुख पटेल, अशोक हिंगे, रामहरी मेटे, नवीदुजमा, शुशीलताई मोराळे, अड. सुभाष राऊत, आसाराम गायकवाड, सलाम शेठ, झहीर कादरी, मतीनभाई, काझी मकदुम, सुदर्शन धांडे, नवनाथ शिराळे, अड.सर्जेराव तांदळे, अड.बाळासाहेब राख, चंदू नवले, संदिप उपरे, अड.अविनाश गंडले, जगदीश गुरखूदे, वसंत मुंडे, अक्रम बागवान, विष्णू वाघमरे, शुभम धूत, अशोक रोमन, अड.राहुल मस्के, बबन वडमारे, अविनाश जावळे, किशोर कांडेकर, दीपक कांबळे, दशरथ सोनवणे, अरुण निकाळजे, धोंडीराम सिरसाट, यांच्यासह वकील, पत्रकार, राजकीय व सामाजिक चळवळीत काम करणारे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. रिपाइंच्या वतीने आयोजित ईद-मिलाफ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मझरखान, राजू जोगदंड, किसन तांगडे,रमेश गंगाधरे, सुलतान बाबा, सिध्दिक फारोखी, बापू पवार, अविनाश जोगदंड, प्रा.बाळासाहेब गव्हाणे, अड.सुरेश वडमारे, अड.गौतम कांडेकर, भैय्यासाहेब मस्के, धम्मा पारवेकर, महेश कागदे, भाऊसाहेब दळवी, सोनू वडमारे, महेंद्र वडमारे, भैय्या साळवे, प्रभाकर चांदणे, दिलिप खंदारे, मिलिंद पोटभरे, अप्पा मुसळे, दिपक अरुण, नामदेव वाघमारे, पप्पू वाघमारे, गणेश वाघमरे, सुभाष तांगडे, गौतम कांबळे, यांच्यासह रिपाइं कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले

COMMENTS