‘सगळे चोर आहे, राज ठाकरे मुर्दाबाद’

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘सगळे चोर आहे, राज ठाकरे मुर्दाबाद’

मुरजी पटेल यांचे समर्थक संतापले

मुंबई प्रतिनिधी-   अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने सपशेल माघार घेतली आहे. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल(Murji Patel) यांना माघार घेण्यास सांगि

मेरिटच्या मुलांवर अन्याय होऊ देणार नाही – जयंत पाटील | LokNews24
मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर पायी प्रवास
लातुरात बनावट नंबरप्लेटचा वापर; ऑटोचालकावर फसवणुकीचा गुन्हा

मुंबई प्रतिनिधी-   अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने सपशेल माघार घेतली आहे. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल(Murji Patel) यांना माघार घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे मुरजी पटेल समर्थक कार्यकर्ते पक्षावर नाराज झाले आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या नावाने घोषणाबाजी केली. तसंच आम्ही पक्षावर नाराज असल्याचे उघडपणे सांगितलं. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांना माघार घेण्यास सांगितल्यानंतर अंधेरीमध्ये भाजपच्या गोटात शांतता पसरली. यावेळी पटेल यांच्या कार्यकर्त्यांकडून पक्षाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे देखील पाहायला मिळत आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार मुरजी पटेल मी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून पक्षाचा आदेश महत्त्वाचा आहे, तो पाळणार आहे, असं पटेल यांनी सांगितलं.

COMMENTS