Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दारू सोडण्याची औषधे बेतली जीवावर

चंद्रपूरमध्ये दोघांचा मृत्यू दोघे अत्यवस्थ

चंद्रपूर ः दारू सोडण्यासाठी कुटुंबियांकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. मात्र व्यसन काही सुटत नाही. त्यामुळे जे कुणी काही सांगतील, ते उपाय केले ज

पुराच्या पाण्यात वाहून गेली कार
भिंतीला भगदाड पाडून मोबाईल शॉपीमध्ये चोरी; घटना CCTVमध्ये कैद
नगरसह संगमनेर-कोपरगाव व श्रीरामपूरला वाढते रुग्ण

चंद्रपूर ः दारू सोडण्यासाठी कुटुंबियांकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. मात्र व्यसन काही सुटत नाही. त्यामुळे जे कुणी काही सांगतील, ते उपाय केले जातात. अशाच एका प्रकारची दारू सोडण्याची औषधे दोघांच्या जीवावर बेतल्याचे समोर आले आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील गुळगाव येथे घडली आहे. या प्रकरणी 2 जण अत्यवस्थ असून, त्यांच्यावर लगतच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुळगाव येथील सहयोग सदाशिव जीवतोडे (19), प्रतीक घनश्याम दडमल (26), सदाशिव पुंजाराम जीवतोडे (45) व सोमेश्‍वर उद्धव वाकडे (35) या 4 जणांना दारूचे व्यसन होते. हे व्यसन सोडण्यासाठी ते मंगळवारी वर्धा जिल्ह्यातील शेडेगाव येथील एक वैद्याकडे गेले होते. त्याच्याकडून त्यांनी दारू सोडण्याचे औषध घेतले आणि गावी परतले. घरी आल्यानंतर त्यांनी ते औषध घेतले असता चौघांचीही प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तत्काळ भ्रद्रावती येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे सहयोग सदाशिव जीवतोडे व प्रतीक घनश्याम दडमल या दोघांचा मृत्यू झाला. इतर दोघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. भ्रदावती पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवलेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

COMMENTS