Homeताज्या बातम्यादेश

इस्रायलमध्ये अल जझीरा वृत्तवाहिनीवर बंदी

नवी दिल्ली : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायलमधील कतारच्या मालकीचे असलेले अल जझीरा वृत्त वाहिनी बंद करण्यात येत असल्याचे जाही

मनसे कार्यकर्ता खूनप्रकरणी जळगावच्या पाचजणांना अटक
सरकारला फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस – गोपाचंद पडळकर | LOKNews24
अखेर लाडकी बहीण योजनेला ब्रेक !

नवी दिल्ली : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायलमधील कतारच्या मालकीचे असलेले अल जझीरा वृत्त वाहिनी बंद करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. या वृत्तवाहिनीचे इस्रायलमधील सर्व कार्यालये बंद करण्यात येणार आहे. या बाबत नेतन्याहू यांनी ’एक्स’ वर पोस्ट केली असून या बाबत निर्णय दिला आहे. इस्रायल-हमास युद्धादरम्यान इस्रायल आणि वृत्तवाहिनीतील वाद वाढला आहे. विशेष म्हणजे, गाझामधील युद्धासंदर्भात इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामासाठी कतार पर्यंत करत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात इस्रायली संसदेने अल जझीरा वाहिनी बंद करण्या संदर्भात निर्णयांसाठी कायदे केले होते. कायदा झाल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायलमध्ये या वृत्त वाहिनीचे कार्यालय बंद करण्यात असल्याचे जाहीर केले. ही वृत्तवाहिनी भडकावणारी व ’दहशतवादी’ कारवायांना प्रोत्साहन देणारी आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. इस्रायलच्या या निर्णयाला प्रत्युत्तर देताना अल जझीराने नेतन्याहू यांच्या प्रक्षोभक भाषणाचा आणि त्यांच्या या वृत्तवाहिनी विरोधातील निर्णयाचा निषेध केला. त्यांनी केलेला आरोप अल जझीराने फेटाळून लावला आहे. तर त्यांच्या या दव्याला त्यांनी हास्यास्पद आणि खोटे म्हटले आहे. अल जझीराने एका निवेदनात म्हटले आहे की नेतन्याहू हे वृत्तवाहिनीचे कार्यालय आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी जबाबदार आहेत. चॅनेलच्या मते, त्यांचे पत्रकार त्यांचे धाडसी आणि व्यावसायिक वृत्तांकन हे सुरूच ठेवणार आहेत.

COMMENTS