Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोले तालुक्यात वादळी वार्‍यांसह अवकाळीचा फटका

अकोले ः उन्हाच्या काहिलीचा प्रचंड त्रास सहन करत असताना अकोले शहराला गुरूवार आणि शुक्रवार असे सलग दोन दिवस वादळी वारे आणि जोरदार पाऊसाने झोडपून का

अहमदनगर मनपा सभागृह नेतेपदी अशोक बडे यांची नियुक्ती
प्रतीक्षा भांगरे बुद्धीमापन स्पर्धेत राज्यात द्वितीय
कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयासाठी एच.आर.सीटी. मशिन उपलब्ध करुन द्यावे : कोल्हे

अकोले ः उन्हाच्या काहिलीचा प्रचंड त्रास सहन करत असताना अकोले शहराला गुरूवार आणि शुक्रवार असे सलग दोन दिवस वादळी वारे आणि जोरदार पाऊसाने झोडपून काढले. यामध्ये अनेक झाडे उन्मळून पडले. आठवडी बाजारातही मोठे नुकसान झाले. अकोले शहरात सायंकाळच्या सुमारास अचानक पाऊस झाला. यावेळी वार्‍याचा वेगही मोठा होता. झाडे कोसळली, काही ठिकाणी पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहेत. गुरुवार असल्याने अकोल्याचा आठवडे बाजार असतो. परंतु सायंकाळी पाऊस पडल्यामुळे  व्यापारी आणि शेतकर्‍यांची धांदल उडाली. तसेच जोरदार वारा व पावसामुळे दुकानदाराचे पाल उडाल्याने शेतीमालासह किराणा व भेळ दुकानांचे मोठे नुकसान झाली आहे. सुमारे दोन तास चाललेल्या पावसामुळे कोल्हार घोटी राज्यमार्गावर भर उन्हाळ्यात  पावसाळ्याचा अनुभव मिळाला. अकोले शहरात वाहतूक ठप्प झाली होती. सर्वत्र पाणीच पाणी साचल्याचे दिसत होते. तरपावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला. शेतकर्‍यांनी साठवलेल्या कांद्याचे ही मोठे
नुकसान झाले. गुरुवार नंतर शुक्रवारी सलग दुसर्‍या दिवशी कोतुळ परिसरात अवकाळी पावसाने झोडपून काढले. कोतुळ व परिसरात शुक्रवारी दुपारी वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विजेचे पोल पडले  तारा तुटूल्याने वीज पुरवठा खंडित झाला.

अनेक ठिकाणी घरे व छपरांचे पत्रे उडाले. तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले विजेचे पोल  पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. भाजीपाला पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आंभोळ पैठण तसेच  सातेवाडी परिसरात पावसाने  मोठे नुकसान झाले कोतुळ परिसरात  टोमॅटो व झेंडू ,वेलवर्गिय भाजीपाल्याच्या बागा जमीनदोस्त झाल्या. कोतुळ व आजु बाजूच्या परिसरामध्ये अतिवृष्टी व वादळ झाल्यामुळे 11 केव्ही अंभोळ, 11 केव्ही धामणगाव पाट, 11 केव्ही नाचनठाव, 11 केव्ही पिंपळगाव खांड, 11 केव्ही मेचकरवाडी व 11 केव्ही अबीतखिंड फिडर वरील पोल व तारांचे मोठे नुकसान झाले आहे. विज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू असल्याचे वीज वितरणाचे सहाय्यक अभियंता प्रकाश कळंबे यांनी सांगितले. महसूल व कृषी विभागाकडून तातडीने  पंचनामे  व्हावे अशी मागणी  कृषिभूषण सयाजीराव पोखरकर यांनी केली आहे.

COMMENTS