Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आखोणी ग्रामस्थांचे कर्जत पंचायत समितीसमोर उपोषण

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत तालुक्यातील आखोणी ग्रामपंचायतच्या कारभारावर विविध आक्षेप घेत हनुमंत लक्ष्मण सूळ व ग्रामस्थांनी कर्जत पंचायत समितीसमोर आंद

*तुमचे आजचे राशीचक्र बुधवार,१६ जून २०२१ l पहा
कामगारांनीही माथाडी मंडळात लेव्ही भरणा करावा
अखेर कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सुटले

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत तालुक्यातील आखोणी ग्रामपंचायतच्या कारभारावर विविध आक्षेप घेत हनुमंत लक्ष्मण सूळ व ग्रामस्थांनी कर्जत पंचायत समितीसमोर आंदोलन केले. हनुमंत सूळ यांच्यासह विष्णुपंत सूळ, रमेश भांडवलकर, ज्ञानदेव चव्हाण, हरिभाऊ सूळ, मधुकर चव्हाण, राजेंद्र चव्हाण, महेश सायकर, शरद रगडे, दादा लष्करे, बंडू काळे व ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी उपोषण केले.
ग्रामस्थांकडून पुढील मागण्या व तक्रारी करण्यात आल्या होत्या. दलित वस्तीमध्ये पेव्हिंग ब्लॉकचे काम इस्टिमेटप्रमाणे झाले नाही. आखोणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कंपाउंडला कलर न देताच त्याचे बिल काढले. निवृत्ती जनार्दन भांडवलकर यांनी अतिक्रमण करून रस्त्यावर बांध घातलेला आहे. समाज मंदीर दुरुस्ती न करता फक्त कलर देवून पैसे काढण्यात आले. जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीचे काम काही वस्तु आहे हेच ठेवून एकदम हलक्या प्रतीचे साहित्य वापरण्यात आले. पाणंद रस्ते, मुरुमीकरण न करता त्याची बिले काढण्यात आली. राशीन रस्ता ते आखोणी नवीन डांबरी हा रस्ता केल्यापासून 2 महिन्यातच पुर्णपणे खराब झाल्याबाबत अर्ज दिला असता त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. जलजीवन अंतर्गत केलेली पाण्याची टाकी अधिग्रहण न करताच काम चालू करण्यात आले व त्या कामाची चौकशी अहवाल दिला नाही. फिल्टर पाण्याचे काम गेल्या पाच महिन्यापुर्वी पुर्ण झाले असून सदरील फिल्टर प्लॅन्ट चालू करण्यात आले नाहीत. 26 जानेवारी 2023 ची ग्रामसभा घेण्याचे ठरलेले होते. मात्र ग्रामपंचायतच्या कामाची विचारणा होईल या भितीपोटी आजपर्यंत ग्रामसभा घेण्यात आलेली नाही. पुढील तहकुब सभा ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडून दीड ते दोन महिन्याने घेण्यात येते. सरपंच व ग्रामसेवक हे ग्रामसभा घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्याची चौकशी करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

COMMENTS