Homeताज्या बातम्यामनोरंजन

3 इडियट्स सिनेमातील ‘लायब्रेरियन दुबे’ अखिल मिश्रा यांचं निधन

  मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूड विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातील लायब्रेरियनच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीच्या

हनुमंत पाटीलबा गायकवाड यांचे निधन
हरितक्रांतीचे जनक थोर शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचं ९८ व्या वर्षी निधन
पढेगावच्या शिंदे दाम्पत्याचे तीन तासाच्या अंतराने निधन

  मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूड विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातील लायब्रेरियनच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिनेते अखिल मिश्रा याचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील मीरा रोड येथील घरात दुपारी अचानक पाय घसरल्याने अखिल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना घाईघाईने दवाखान्यात नेऊन दाखल करण्यात आलं. जखम खोल असल्याने डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत आणि काही तासांतच त्यांचा मृत्यू झाला. अखिल यांची पत्नी सुझान बर्नेट चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादला गेली होती. सुझैनच्या मॅनेजरने अखिल यांच्या मृत्यूबाबत ही माहिती दिली.

अखिल मिश्रा यांनी अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी भंवर, उत्तरन, उडान, सीआयडी, श्रीमान श्रीमती, भारत एक खोज, रजनी असे शो केले होते. चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्याने डॉन अब्बा, हजारों ख्वाइशे ऐसी, 3 इडियट्स या चित्रपटात काम केलं होतं. अखिल यांनी वर्षानुवर्षे इंडस्ट्रीत काम केले पण त्यांना 3 इडियट्समधील लायब्रेरियन दुबेच्या भूमिकेतून ओळख मिळाली. उत्तरन या मालिकेतील उमेद सिंग बुडेलाच्या भूमिकेतही त्यांना खूप पसंती मिळाली.

COMMENTS