Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कन्हैया दूध उद्योग समूहाकडून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

निघोज प्रतिनिधी ःपारनेर तालुक्यातील निघोज येथे कन्हैय्या उदयोग समुहाच्या वतीने मंगळवार दि.2 एप्रिल पासून भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन केले आहे.उदय

श्री क्षेत्र पंचाळेत सदगुरू गंगागिरी महाराजांचा 177 वा अखंड हरिनाम सप्ताह
आगडगावमध्ये नवरात्र उत्सव निमित्ताने महिला अखंड हरिनाम सप्ताह 
ओझर खेड येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न 

निघोज प्रतिनिधी ःपारनेर तालुक्यातील निघोज येथे कन्हैय्या उदयोग समुहाच्या वतीने मंगळवार दि.2 एप्रिल पासून भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन केले आहे.उदयोग समुहाच्या माध्यमातून गेली 27 वर्ष अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. या किर्तन सोहळ्यात ह.भ.प.शिवलीलाताई पाटील, ह.भ.प.सागर महाराज शिर्के, ह.भ.प.गणेश महाराज शिंदे ,  ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज, ह.भ.प.राहुल महाराज पाटील, ह.भ.प.प्रकाश महादेव साठे यांची किर्तनसेवा होणार आहे.काल्याची किर्तनसेवा ह.भ.प.समाधान महाराज शर्मा यांची होईल. किर्तन सोहळ्यास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून किर्तन श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन कन्हैय्या उदयोग समुहाचे सीईओ मच्छिंद्र लंके, संस्थापक शांताराम लंके व जी एस महानगर बँकेचे संचालक बबनराव लंके यांनी केले आहे.

विविध उपक्रमात कन्हैया दूध उद्योग समूह अग्रभागी – धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यात कन्हैया दूध उद्योग समूह सातत्याने अग्रभागी असतो. प्रत्येक क्षेत्रात सेवाभाव करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याने याचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळत आहे. मळगंगा मिल्क ग्रो अ‍ॅन्ड प्रॉडक्ट संचलित कन्हैया दूध उद्योग माध्यमातून लाखो लिटर दूधाचे संकलन प्रतिदिन होत असल्याने तसेच दूधावर प्रक्रिया होऊन उपपदार्थ उत्पादन होत असून राज्य तसेच राज्याबाहेर व परदेशात दूध व उपपदार्थ पाठवले जातात. यातून राज्यातील लाखो लोकांना रोजगार मिळाला आहे. तसेच हजारो व्यवसायीकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ मिळाले आहे. कन्हैया दूध उद्योग समूहाच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने औद्योगिक क्रांती झाली असून सर्वसामान्य जनतेला पाठबळ देणारा उद्योग समूह असल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.

COMMENTS