Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कळसमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ

अकोले/प्रतिनिधी ः अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या परमपूज्य सुभाष पुरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अकोले तालुक्यातील कळस य

ओझर खेड येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न 
कन्हैया दूध उद्योग समूहाकडून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
श्री क्षेत्र पंचाळेत सदगुरू गंगागिरी महाराजांचा 177 वा अखंड हरिनाम सप्ताह

अकोले/प्रतिनिधी ः अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या परमपूज्य सुभाष पुरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अकोले तालुक्यातील कळस येथे गणेश उत्सव तसेच ऋषिपंचमी ते वामन जयंती या पावन पर्व काळात अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भाद्रपद शुद्ध पंचमी ते भाद्रपद शुद्ध बारस बुधवार दिनांक 20 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या कार्यकाळात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार, गायनाचार्य, मृदूंगाचार्य यांचे उपस्थित कार्यक्रम आयोजित केला आहे.  ह.भ.प. राजेंद्र महाराज सदगीर, अरुण महाराज शिर्के, जगदीश महाराज जोशी, जयेश महाराज भाग्यवंत, ज्ञानेश्‍वर महाराज कदम, जगन्नाथ महाराज पाटील, समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन तर संस्कृती महाराज वाकचौरे, देवराम महाराज वाकचौरे, गणेश महाराज वाकचौरे, कैलास महाराज आहेर, सुदाम महाराज कोकणे, दीपक महाराज देशमुख, विष्णु महाराज वाकचौरे यांचे प्रवचन होणार आहे. ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीर, ठाणे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. ज्ञानेश्‍वरी पारायण व्यासपीठ निवृत्ती महाराज बिबबे हे चालवणार आहेत. मृदंगाचार्य संकेत महाराज आरोटे, गायकवृंद किरण महाराज शेटे, रविदास महाराज जगदाळे, प्रवीण महाराज पांडे हे उपस्थित राहणार आहे . तरी सर्व नागरिकांनी या ज्ञानदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन कळस ग्रामस्थ, कळसेश्‍वर भजनी मंडळ यांनी केले आहे.

COMMENTS