Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुकडीचे आवर्तनासाठी अजितदादा सकारात्मक ः नागवडे

श्रीगोंदा शहर : कुकडी डाव्या कालव्याच्या मागील आवर्तनामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील शेतकर्‍यांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळाले नाही. त्याचप्रमाणे कुक

तुमचे आजचे राशीचक्र मंगळवार, ८ जुन २०२१ l पहा LokNews24
सव्वाशेवर जागांसाठी तब्बल बारा हजारावर आले अर्ज
आ. थोरातांनी बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची घेतली भेट

श्रीगोंदा शहर : कुकडी डाव्या कालव्याच्या मागील आवर्तनामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील शेतकर्‍यांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळाले नाही. त्याचप्रमाणे कुकडी कॅनॉलवर अवलंबून असणार्‍या एकाही उदभवांमध्ये पाणी सोडले गेले नाही. त्यामुळे आज रोजी श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रातील उभी पिके पाण्याअभावी संकटात सापडलेली आहेत. त्यामुळे चारा पिकांना जीवदान देणे व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविणे याकरिता कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन तातडीने सोडण्याची आग्रही मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजित दादा पवार यांचे कडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी मुंबईमध्ये समक्ष भेट घेऊन आग्रही मागणी केली. त्यावेळी नामदार अजितदादा पवार यांनी आवर्तन सोडणे बाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे नागवडे यांनी सांगितले.

COMMENTS