Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवारांनी संघ मुख्यालयात जाणे टाळले

नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महायुतीचे आमदार आणि मंत्र्यांना रेशीमबागेतील संघ मुख्यालयात निमंत्रित करण्यात आले ह

कर्नाटक सीमाप्रश्‍नी न्यायालयीन लढा – मुख्यमंत्री शिंदे
अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस ; जागा वाटपाचा घोळ कायम
ओबीसी नेत्यांना संपवण्यासाठी विरोधक एकत्र

नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महायुतीचे आमदार आणि मंत्र्यांना रेशीमबागेतील संघ मुख्यालयात निमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार गुरूवारी सकाळी स्मृतिमंदिरस्थळी आयोजित संघ परिचय वर्गात युतीच्या आमदारांना हजेरी लावली. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघ मुख्यालयात जाणे टाळले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र संघ मुख्यालयात जात हेडगेवारांसमोर नतमस्तक झाले. यावेळी संघाचे विदर्भ प्रांत संघचालक श्रीधर गाडगे आणि महानगर संघचालक राजेश लोया यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.
संघ मुख्यालयात सर्व आमदारांना संघातर्फे सुरू असलेल्या विविध सेवाकार्‍यांबाबत ते माहिती दिली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, पंकज भोयर, चित्रा वाघ, जयकुमार रावल, श्रीकांत भारतीय, शिवेंद्रराजे भोसले, संजय राठोड, गणेश नाईक, चंद्रशेखर बावनकुळे, नीलेश राणे, राम शिंदे, प्रवीण दरेकर, नितेश राणे यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे आमदार स्मृती स्थळाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. दरवर्षी हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजप आणि सहयोगी पक्षाचे आमदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृती भवन परिसराला भेट देतात. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षांचे आमदारांना देखील संघाकडून निमंत्रण देण्यात आले आहे. गेल्या वर्षी देखील महायुतीच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले होते. मात्र अजित पवार अनुपस्थित होते. यावर्षी देखील अजित पवार आले नसल्याची माहिती समोर आली आहे.

COMMENTS